


पुणे, ५ नोव्हेंबर २०२५ – पिंपरी पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केन्द्रात कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या वतीने ‘वन हेल्थ अवेअरनेस कॅम्पेन २०२५’ चे उद्घाटन ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र (आरएचटीसी ) आळंदी आणि नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र (युचटीसी), अजमेरा येथे आयोजित उत्साही वॉकथॉनद्वारे करण्यात आले.

या कार्यक्रमाने ‘नॅशनल वन हेल्थ मिशन (एनओएचएम) कॉन्क्लेव्ह २०२५’ अंतर्गत महिनाभर चालणाऱ्या शैक्षणिक व जनजागृती उपक्रमांच्या मालिकेला सुरवात झाली. हा उपक्रम ‘इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन (IAPSM)’ आणि ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)’यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.
या मोहिमेचा विषय “वन वर्ल्ड, वन हेल्थ – युनायटेड फॉर ह्युमन, अॅनिमल अँड एन्व्हायर्नमेंटल वेलबीइंग” असा आहे, जो मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याच्या परस्परसंबंधांवर भर देतो. ही मोहीम झूनोटिक आजार, अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (एएमआर), अन्नसुरक्षा आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर जागतिक आरोग्य आव्हानांना सामोरे जाण्यासाठी एकत्रित आणि शाश्वत कृती करण्याचे आवाहन करते. तसेच या मोहिमेचा उद्देश वैद्यकशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमधील सहकार्य, शिक्षण आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देत अधिक आरोग्यदायी आणि संतुलित घडविणे हा आहे.
या वॉकथॉनमध्ये पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, इंटर्न्स, नर्सिंग व दंतवैद्यकीय विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग आणि आरोग्य कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या, पशुवैद्यकीय तज्ञ, पोलिस अधिकारी आणि शाळकरी विद्यार्थी यांच्या सहभागामुळे ‘वन हेल्थ’ उपक्रमातील समन्वयात्मक सहकार्याचा खरा आत्मा अनुभवायला मिळाला. सहभागींकडून ‘वन हेल्थ’ आणि समुदाय एकजुटीचे संदेश देणारे फलक व बॅनर घेऊन जनजागृती करण्यात आली. या वॉकथॉनने संस्थेच्या एकात्मिक सार्वजनिक आरोग्य उपक्रमांना तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या दृढ वचनबद्धतेचे प्रत्यक्ष उदाहरण सादर केले.
वॉकथॉननंतर संस्थेने नोव्हेंबर महिन्यातील पुढील काळासाठी विविध उपक्रमांची आखणी केली आहे, ज्यामध्ये वेबिनार्स, आंतरविभागीय सीएमई कार्यक्रम, पोस्टर व रील स्पर्धा, नवकल्पना प्रदर्शन, विद्यार्थी सहभाग उपक्रम तसेच ग्रामीण व नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये समुदाय जनजागृती मोहिम आयोजित केल्या जाणार आहेत. हे उपक्रम शैक्षणिक शिक्षण आणि वास्तव समुदाय सहभाग यांचा सुंदर संगम घडवत आणि राष्ट्रीय ‘वन हेल्थ मिशन’च्या उद्दिष्टांना पाठबळ देणारा ठरणार आहे.
या उपक्रमाविषयी बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे चे प्र-कुलपती माननीय डॉ. भाग्यश्री पी. पाटील, यांनी सांगितले, “डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे येथे आम्ही मानतो की मानव आरोग्य, प्राणी आरोग्य आणि पर्यावरण हे एकमेकांशी घनिष्टरीत्या जोडलेले आहेत. ‘वन हेल्थ’ मोहीम ही सर्व जीवसृष्टीच्या कल्याणासाठी शाश्वत व्यवस्था उभारण्याच्या आपल्या सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देते. ही मोहीम समुदाय कल्याण आणि पर्यावरणीय योगदानासाठी आमच्या बांधिलकीचे प्रतीक आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांचे विश्वस्त व खजिनदार माननीय डॉ. यशराज पी. पाटील यांनी सांगितले, “विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्साही सहभाग आमच्या संस्थेच्या सहयोग आणि नवकल्पनांवरील विश्वासाचे प्रतिक आहे. ‘वन हेल्थ’ मोहीम दर्शवते की बहुविषयक शिक्षणाद्वारे समाजावर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करून देशाच्या सार्वजनिक आरोग्य उद्दिष्टांना गती देता येते.”
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे चे अधिष्ठाता डॉ. रेखा आर्कोट म्हणाले, “हा उपक्रम शिक्षण, संशोधन आणि सामाजिक जबाबदारी यांचे एकत्रीकरण करतो. यामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याच्या सर्वसमावेशक दृष्टिकोनाची जाणीव होते आणि संवेदनशील, वैज्ञानिकदृष्ट्या जिज्ञासू आणि जबाबदार आरोग्यसेवा नेते बनण्याची प्रेरणा मिळते.”
डॉ. हेतल राठोड, प्राध्यापक व प्रमुख, कम्युनिटी मेडिसिन विभाग, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “‘वन हेल्थ’ मोहीम ही शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि समाजसहभागाचा सुंदर मिलाफ आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही अधिक आरोग्यदायी आणि शाश्वत भविष्यासाठी सामूहिक जागरूकता आणि कृती प्रेरित करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
डॉ. अखिल आर. नायर, सहाय्यक प्राध्यापक, कम्युनिटी मेडिसिन विभाग आणि ‘नॅशनल वन हेल्थ मिशन कॉन्क्लेव्ह’ समन्वयक, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “ही मोहीम संस्थेच्या एकात्मिक, प्रत्यक्ष शिक्षण पद्धतीचे प्रतिबिंब आहे जी वर्गखोल्यांना थेट समुदायांशी जोडते. यामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात सामूहिक सहभाग, नवकल्पना आणि प्रगतीसाठी प्रेरणा मिळते.”
शैक्षणिक कार्यक्रमांना वास्तव जीवनातील आव्हानांशी जोडून ही संस्था प्रतिबंधात्मक आणि सामुदायिक वैद्यक क्षेत्रात आघाडीचे स्थान राखत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
