


पिंपरी चिंचवड, ता. ९: राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपळे गुरव , पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र राज्य तर्फे मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा मुक्तिसंग्राम समन्वय समिती यांच्यामार्फत मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ठराव करताच रवा, मैदा, व साखर या प्रत्येकी एक अशा 50 किलोचे तीन कट्टे साहित्य प्रतिष्ठान तर्फे मदत केली आहे.

सेवादान हीच ईश्वर सेवा समजून सेवा करणारे प्रतीक नवले, संदेशकुमार नवले, सामाजिक कार्यकर्ते हिरामण देवकर यावेळी उपस्थित होते. या सहकार्यामुळेच संकटग्रस्तांना दिलासा मिळणार आहे.
मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. अनेक शेतकरी बेघर झालेल्याना स्व राजीव गांधी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर वतीने शहरातील विविध संस्था व संघटनाना मदत केल्याने मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा मुक्तिसंग्राम समन्वय समिती यांनी प्रतिष्ठानचे आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
