Skip to content
01/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • चिखली-मोशी शिवरस्ता कोंडीवर ‘‘रामबाण उपाय’’
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

चिखली-मोशी शिवरस्ता कोंडीवर ‘‘रामबाण उपाय’’

suwarna gaware 07/10/2025
bc2f4528-96ed-4ceb-999a-9fd9c1e15fca
Spread the love
  • आमदार महेश लांडगे यांचा आणखी एक ‘‘सर्जिकल स्ट्राईक’’
  • बोऱ्हाडेवाडी- मोशीतील वाहतूक सक्षमीकरणासाठी नवा मार्ग

पिंपरी-चिंचवड, ता. ७: भोसरी विधानसभा मतदार संघातील चिखली-मोशी शिवरस्त्यावरील वाढत्या वाहतुकीचा ताण अखेर कमी होणार आहे. भूमिपुत्र-जागामालक आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने या भागाला वाहतुकीचा पर्यायी मार्ग मिळाला आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून गेल्या 1997 पासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम एका रात्रीत सुरू करण्यात आले. वाहतूक सक्षमीकरणासाठी केलेल्या या ‘‘सर्जिकल स्ट्राईक’’बाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

चिखली, मोशी, बोऱ्हाडेवाडी परिसरात वाढती लोकसंख्या आणि रहदारीमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभभूमीवर वाहतूक सक्षमीकरणासाठी स्थायी उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यायी रस्ते, डीपी रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिले जात आहे.

मोशी- बोऱ्हाडेवाडी येथील वुड्सविले फेज-वन, कुमार प्रिन्सविले, स्वराज सोसायटी या परिसरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम वेगाने सुरु झाले असून, या मार्गामुळे शिवरस्त्यावरील वाहतुकीचा बोजा लक्षणीय प्रमाणात कमी होणार आहे.या रस्त्यासाठी लागणारी खासगी जागा सामाजिक भावनेतून बोराटे व बोऱ्हाडे कुटुंबीयांनी विनामोबदला हस्तांतरित केली. त्यासाठी शेतकरी मधुकर बोराटे, संतोष बोराटे, सुनील बोराटे आणि सिताराम बोराटे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या योगदानाबद्दल आमदार लांडगे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि प्रशासन यांच्या तांत्रिक अडचणींमुळे जागा ताब्यात न आल्यामुळे प्रलंबित असलेले काही रस्ते आम्ही विकसित करण्यात यशस्वी झालो आहोत. याकामी शेतकरी, भूमिपुत्र आणि जागामालक तसेच बांधकाम व्यावसायिक यांच्यात समन्वय करुन समझोता करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामध्ये आमदार लांडगे यांना यश मिळाले आहे.

या प्रभागातील लोकप्रतिनिधी आणि माजी महापौर राहुल जाधव, माजी नगरसेविका सारिका नितीन बोऱ्हाडे, तसेच निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, नितीन बोऱ्हाडे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.



भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांमध्ये 1997 पासून प्रलंबित विकासकामांना आम्ही गती दिली. 2014 पासून पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर आम्ही भर दिला. त्यामुळे चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकसित झाला आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांमुळे वाहतुकीवर ताण येत आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील रस्ते विकसित करण्यास प्राधान्य दिले जात आहे. आगामी काळात वाहतूक कोंडीमुक्त पिंपरी-चिंचवड असा संकल्प आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वोतोपरी पुढाकार घेणार आहोत.

  • महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 35
Tags: #moshi #nikhilborhade #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: तातडीने शहरातील गृहप्रकल्पातील लिफ्टचे सुरक्षा ऑडिट करा :आमदार शंकर जगताप
Next: बांधकाम आणि घरेलु कामगारांना ५ हजार दिवाळी बोनस द्यावे.

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.