


पिंपरी चिंचवड, ता. ३: सौ. अनिताताई संदीप काटे यांच्या संकल्पनेतून व निलेश काटे युवा मंच आयोजित भव्य दांडिया महोत्सव 26,27 आणि 28 सप्टेंबर हे तीन दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.

हे तीन दिवस पिंपळे सौदागर मधील महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग नोंदवला, व तीन दिवस रोज पिंपळे सौदागर येथील सरासरी 2000 लोकांनी सहभाग घेतला.

या दांडिया कार्यक्रमात रोज 100 पेक्ष्या जास्त बक्षिसे होती व लकी ड्रॉ सुद्धा होता त्यात रोज एका महिलेला iphone जिंकण्याची सुवर्ण संधी मिळाली. तीन दिवस तीन iphone लकी ड्रॉ साठी ठेवले होते. त्यात पहिल्या दिवशी स्वाती संदीप जाधव दुसऱ्या दिवशी शोभा मिरचंदाणी आणि तिसऱ्या दिवशी गौरी अमित काटे या महिलांना लकी ड्रॉ मधून iphone 15 जिंकला.
महोत्सवात चिंचवड मतदारसंघाचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप हे विशेष उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात अनिताताई काटे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले आणि महिलांच्या उत्साही सहभागाचे अभिनंदन केले.
तसेच पिंपळे सौदागरचे नगरसेवक श्री. शत्रुघ्न काटे हेही या प्रसंगी उपस्थित होते व त्यांनी मोठ्या उत्साहाने आपले विचार व्यक्त केले.
अनिताताई काटे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सक्रीय सहभागाबद्दल आणि समाजातील एकोपा वाढविणाऱ्या या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.
अनिताताई काटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दांडिया महोत्सव हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून समाजातील महिलांना एकत्र आणणारा, त्यांना व्यासपीठ देणारा व उत्साहाने सहभागी होण्याची संधी देणारा उपक्रम आहे.
महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून या महोत्सवाचे खरे सौंदर्य वाढवले आहे. कुटुंबासह आनंद साजरा करण्याची ही एक संधी आहे आणि यातून सामाजिक ऐक्य, आपुलकी आणि एकमेकांशी जुळलेले नाते अधिक घट्ट होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात अशा सांस्कृतिक कार्यक्रमांची खरी गरज आहे, ज्यातून आपण आपल्या परंपरा जपत नव्या पिढीला संस्कार देऊ शकतो. समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग आणि आनंद हाच या महोत्सवाचा खरा यश आहे.
त्यांनी शेवटी उपस्थित मान्यवर, नागरिक, महिला व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
