


पिंपळे सौदागर, ता. ३ – चॅलेंजर पब्लिक स्कूलचा विद्यार्थी ईश्वर पाटील (इयत्ता 2 री) याने जी.के. गुरुकुल येथे झालेल्या स्टेट लेव्हल विद्यान फेस्ट इंटरस्कूल स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवत शाळेचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी ईश्वरचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांची प्रगती म्हणजेच शाळेची खरी ओळख. ईश्वरचे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.” तसेच प्राचार्या सुविधा महाले यांनीही ईश्वरला शुभेच्छा देत त्याच्या परिश्रमाचे आणि सातत्याचे कौतुक केले.
ईश्वरच्या यशामध्ये त्याचे शिक्षक रोहिणी वानखेडे व स्वप्नाली प्रतापवार यांच्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे व मेहनतीमुळे ईश्वरने हे यश मिळवले असल्याचे शाळेतर्फे सांगण्यात आले.
ईश्वर पाटीलच्या या यशामुळे शाळेत आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
