


कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेऊ – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई / पिंपरी दि १२ – महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समिती आणि कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रश्न घेऊन आज आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा हजारोंच्या संख्येने मोर्चा धडकला.
पोलीस प्रशासनाने शिष्टमंडळाची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याशी भेट घडवून दिली मंत्र्यांनी मागण्यावर सविस्तर चर्चा केली असता त्यानी आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ आणि त्यासाठी लवकरच बैठकीच्या आयोजन करू असे आश्वासन दिले.
बांधकाम कामगार स्वतंत्र कृती समितीचे सागर तायडे, कामगार नेते काशिनाथ नखाते यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला . यावेळी वर्धा चे प्रशांत रामटेके,धाराशिव चे आनंद भालेराव, यवतमाळचे रत्नपाल डोफे,मुंबईच्या विनिता बाळेकुंद्री, अकोला चे प्रशांत मेश्राम, नाशिकचे सुनील लाखे, संभाजीनगरचे कमलेश दाभाडे, हिंगोलीचे नितीन दवंडे,कोल्हापूरचे राजेंद्र सुतार, साताऱ्याचे सागर कुंभार, लातूरचे अजय कांबळे, सोलापूरचे ज्ञानेश्वर देशमुख, भंडाऱ्याचे मंगेश माटे उपाध्यक्ष राजेश माने,सुनील भोसले, सलीम डांगे, किसन भोसले, रुक्मिणी जाधव, बालाजी लोखंडे, महादेव गायकवाड, लाला राठोड , निरंजन लोखंडे, दिलीप डिकोळे,तुकाराम माने ,नवनाथ जगताप , अशोक पगारे, सहदेव होनमाने, हरी भाई , सखाराम केदार, सुग्रीव नरवटे, फरीद शेख, शामशुद्दीन शेख, माधुरी जलमुलवार,सुनीता दिलापाक, मंगला श्रीराम, अक्काताई लोंढे, नंदा जाधव, सुनंदा लोंढे, विजया पाटील, अश्विनी मालुसरे,आनंदा जाधव, सरस्वती प्रधान,रेश्मा पांचाळ स्वाती काळे, सिराज शेख,राणी ठोकळ आदी उपस्थित होते.
नखाते म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या महामंडळा कडून धीम्या गतीने राबवल्या जात आहेत. मात्र बांधकाम कामगारांना अनेक त्रुटींचा सामना करावा लागत असून दिवसेंदिवस रांगेत उभे राहून हे कामगारांचे काम होत नाही, पडताळणीची दररोज असणारी संख्या कमी असल्याने चार-पाच महिन्यानंतर कामगारांचा नंबर येतो यामुळे योजनेचे लाभ घेताना अडचणीचा सामना कामगारांना करावा लागत आहे.
योजनांचा लाभ द्यायला टाळाटाळ केली जात आहे विशिष्ट लोकांनाच लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे हे दूर झाले पाहिजे. कामगारांच्या आरोग्याच्या नावाखाली हॉस्पिटल मध्ये लूट केली जात असून आवश्यक नसलेल्या सुविधा दिल्याचे दाखवून फसवणूक केली जात आहे. पेन्शन योजना फसवी असून खरी पेन्शन योजना सुरू करावी यासाठी लढा सुरूच राहील यापुढेही प्रश्न सुटले नाहीत तर मोठ्या आंदोलनाची भूमिका आम्ही घेणार आहोत .
महाराष्ट्र राज्यातल्या विविध जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम कामगारांचा भव्य मोर्चा आझाद मैदान येथे पोहोचल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी कल्याणकारी महामंडळाचे सोशल सोशल ऑडिट करावे कामगारांना नुकसानकारक असणारे तालुका सुविधा केंद्र बंद करा मंडळास ई प्रशासन धोरण लागू करा कामगारांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन सुरू करा शासन आदेशानुसार कामगार संघटने कडून अर्ज स्वीकृती प्राधान्य देण्यात यावे व कामगार पडताळणी संख्या दररोज ३०० करावी अशा मागण्यांचे निवेदन घेऊन शिष्टमंडळाने मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर b यांच्याशी चर्चा केली .
यावर कामगार मंत्र्यांनी स्टाफ मध्ये वाढ करून परिस्थिती सुधारू संघटनेच्या मागण्यावर सकारात्मक विचार सुरू असून मागण्या सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातील तसेच हे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरच आपल्या संघटनांची बैठक बोलावून प्रश्न सोडवू असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज दिले.
म्हातारपणी पेन्शन मिळालीच पाहिजे, मंडळाचे खाजगीकरण थांबलेच पाहिजे ,दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे ,तालुका सुविधा केंद्र बंद झालेच पाहिजे, ट्रेड युनियनला विश्वासात घेतलेच पाहिजे, आदी घोषणा देत कामगारांनी आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️