


पिंपळे सौदागर, ता. ११ – विरश्री शाखा राष्ट्रसेविका समिती पिंपळे सौदागर यांच्या वतीने चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. ‘राखी’ या पवित्र धाग्याद्वारे प्रेम, विश्वास आणि आपुलकीचे नाते दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमात समितीच्या सेविकांनी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांना राख्या बांधून समाजातील विविध घटकांमध्ये ऐक्य, बंधुभाव आणि सेवा भावना वृद्धिंगत करण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना शाळेचे संचालक श्री. संदीप काटे यांनी रक्षाबंधनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भ उलगडून सांगितला. त्यांनी या सणातून मिळणाऱ्या ‘बंधुभाव, परस्पर सन्मान व जबाबदारी’ या मूल्यांचा जीवनात अंगीकार करण्याचा संदेश दिला.
या प्रसंगी शाळेचे वातावरण बंधुत्व, आनंद आणि सांस्कृतिक रंगांनी भरून गेले होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या कॉर्डिनेटर सौ. दीप्ती बक्षी यांनी उपस्थित पाहुणे, शिक्षक, कर्मचारी व उपस्थिती मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️