Skip to content
28/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने महामोर्चा: प्रारूप विकास आराखड्याविरोधात गुरूवारी एल्गार!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Poilitical

राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने महामोर्चा: प्रारूप विकास आराखड्याविरोधात गुरूवारी एल्गार!

suwarna gaware 05/08/2025
b0a8c451-cfab-445c-bb82-9587e07cf71e
Spread the love

पिंपरी, दि.५ : विकास नियोजन विशेष घटक पिंपरी चिंचवड महानगरपालिका उपसंचालक (नगररचना) व मा.आयुक्त,प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्याला दिशा देणारा प्रारूप सुधारित विकास आराखडा २०२५ हा केवळ कागदावरचा देखावा असून तो शहरातील जनतेच्या भावना, कायदेशीर बाबी आणि विकासाच्या वास्तवाशी पूर्णपणे विसंगत आहे. तब्बल ५०,००० नागरिकांनी हरकती घेतल्या ही त्याची पावती आहे.

भूमिपुत्र, शेतकरी, छोटे कारखानदार, गोरगरिब सामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा पूर्ण करण्यास हा आराखडा सपशेल अपयशी ठरल्याचा हा पुरावा आहे. या आराखड्यातील गंभीर त्रुटी, अनियमतता आणि जनविरोधी धोरणांविरोधात आवाज उठविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने गुरूवार, दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी महापालिका भवनावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांना बगल देत, हा आराखडा केवळ जुन्या चुकांची पुनरावृत्ती करत आहे.

हा प्रारूप आराखडा केवळ बेकायदेशीरच नाही, तर पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक अव्यवहार्यता आणि समन्वयाच्या अभावाचे उत्तम उदाहरण आहे. जुन्या आराखड्यातील ८०० हून अधिक आरक्षणे (एकूण १,४३० पैकी ५६%) कोणतीही फेरबदल न करता तशीच ठेवण्यात आली आहेत. विशेषतः, फक्त २०.८% आरक्षित जागांचा विकास झाला असून, १,१०० हून अधिक जागा अविकसित राहिल्या किंवा त्यावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यामुळे आराखड्याची व्यवहार्यता धोक्यात आली असून, सार्वजनिक सुविधा केवळ कागदावरच राहिल्या आहेत. कालबाह्य आरक्षणांमुळे कायदेशीर वाद आणि महापालिकेचा आर्थिक भारसुध्दा वाढला आहे.


‘भीमसृष्टी मैदान’वरील धक्कादायक आरक्षणे:
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील ऐतिहासिक ‘भीमसृष्टी मैदान’वर पोलीस स्टेशन, मनपा उपयोग आणि बस टर्मिनसचे आरक्षण प्रस्तावित करणे हा आंबेडकरी अनुयायी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांवर केलेला क्रूर हल्ला आहे. हे मैदान आंबेडकरी चळवळीची आणि पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक एकोप्याची जिवंत साक्ष आहे, जिथे हजारो नागरिक डॉ. आंबेडकर जयंतीसह वर्षभरात अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी एकत्र येतात. या मैदानाचे महत्त्व दुर्लक्षित करून, त्यावर आरक्षण टाकणे निषेधार्ह आहे. तसेच चिंचवड गावातील ऐतिहासिक चाफेकर स्मारकासाठी असलेल्या आरक्षणावर इतर आरक्षणे टाकले आहे. अशा चुकीच्या आरक्षणामुळे नागरिकांच्या भावनांचा व समाजाचा खेळ झाला आहे.


रेडझोन आणि पूररेषेत आरक्षणे –
देहू दारूगोळा कोठाराच्या २००० यार्ड प्रतिबंधित क्षेत्रात, पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या निळ्या आणि लाल पूररेषांमधील नाविकास क्षेत्रात तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांच्या १०० मीटर बफर झोनमध्ये बांधकामाला प्रतिबंध असतानाही, येथे शाळा, रुग्णालये, हॉकर्स झोन यांसारखी बांधकामयोग्य आरक्षणे प्रस्तावित केली आहेत.
पूररेषेचा घोटाळा –


सुधारित विकास आराखड्यात पूररेषांची आखणीमध्ये हेतुपुरस्सर बदल करण्यात आले आहेत. यामुळे काही जमिनी नाविकास क्षेत्रातून बाहेर पडल्या, तर काही विकसनशील जमिनी अकारण नाविकास क्षेत्रात समाविष्ट झाल्या, ज्यामुळे विशिष्ट जमीन मालकांना फायदा होत असून इतरांना नुकसान सोसावे लागत आहे.

HCMTR ३५ वर्षे कागदावरच –
३० मीटर रुंद आणि ३० किमी लांबीचा हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रोड (HCMTR) चा प्रस्ताव गेली ३५ वर्षे केवळ कागदावरच आहे. मोठ्या प्रमाणात पक्क्या बांधकामांमुळे त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पर्यायी मार्गांचा विचार न करता, केवळ ‘कॉपी पेस्ट’ धोरण अवलंबल्याने बाधित होणाऱ्या नागरिकांचे हाल कायम आहेत.

पिंपरी कँम्प गावठाण मागणीकडे दुर्लक्ष –
पिंपरी कॅम्प हा मूळतः निर्वासितांच्या छावणीचा १०-१२ फूट रुंद आणि ४०-५० फूट लांब असलेल्या जमिनींवर दाट लोकवस्तीने विकसित झालेला परिसर आहे. या भागाला ‘कँजस्टीड एरिया’ म्हणजेच ‘गर्दी’ ‘गावठाण’ क्षेत्र म्हणून घोषित करण्याची दीर्घकाळापासूनची मागणी आणि महानगरपालिकेतील ठरावही दुर्लक्षित करण्यात आला आहे. यामुळे या परिसराच्या ऐतिहासिक आणि सामाजिक संरचनेचे जतन होण्यास अडथळा निर्माण झाला आहे.

एकिकडे घरांवरची आरक्षण वगळले, दुसरीकडे टाकले –
आराखड्यात अनेक ठिकाणी आरक्षणांचे ‘हब’ प्रस्तावित केले आहे, जे शहर नियोजनाच्या दृष्टीने कुचकामी आहे. ५००-७०० मी. च्या अंतरावर एकाच प्रयोजनाची अनेक आरक्षणे (उदा. चऱ्होलीत १३ दवाखाने) प्रस्तावित केली आहेत. विशेष म्हणजे, पूर्वीच्या आराखड्यातील २२५ आरक्षणे पक्क्या घरांमुळे वगळली असताना, आता नव्याने अस्तित्वातील घरांवर आरक्षणे प्रस्तावित केली आहेत. हा धोरणातील विरोधाभास अंमलबजावणीमध्ये मोठे अडथळे निर्माण करेल.

अधिकृत बांधकामेही धोक्यात –
अनेक अधिकृत बांधकाम परवानगी असलेल्या इमारती आणि मंजूर खाजगी ले-आउट्सवर नव्याने आरक्षणे/रस्ते रुंदीकरण प्रस्तावित केल्याने शेकडो वैध बांधकामे धोक्यात आली आहेत. प्राधिकरणाच्या सेक्टर २१ मधील वैधरीत्या विकसित केलेल्या मिळकती आणि सेक्टर २२ मधील जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत गोरगरीबांसाठी बांधलेले पुनर्वसन प्रकल्प हे देहूरोड दारुगोळा कोठाराच्या प्रतिबंधित क्षेत्रात (रेड झोन) समाविष्ट झाल्याने तेथील मालमत्तांवर पुनर्बांधणी, सुधारणा, हस्तांतरणास मर्यादा आल्या आहेत आणि त्यांचे बाजारमूल्य घसरले आहे.

सुधारित विकास आराखड्यात महिला, किशोरवयीन मुली, अपंग व्यक्ती आणि वृद्धांसाठी सार्वजनिक शौचालये आणि युरीनल्ससाठी कोणतीही तरतूद नाही. ही मूलभूत चूक सार्वजनिक आरोग्य, लिंग समानता आणि स्वच्छतेच्या राष्ट्रीय व जागतिक आदेशांचे गंभीरपणे दुर्लक्षित करते.

अनेक कायद्यांचे उल्लंघन –
प्रारूप सुधारित विकास आराखडा २०२५ हा पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची दिशा ठरवण्याऐवजी, शहराच्या समस्यांमध्ये भर घालत आहे. अनेक वैधानिक नियम आणि कायदेशीर आदेशांचे उल्लंघन करत तयार केलेला हा आराखडा पूर्णपणे बेकायदेशीर ठरतो.

पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक अव्यवहार्यता, कुचकामी नियोजन, समन्वयाचा अभाव, पक्षपातीपणा, अपूर्ण माहिती, डोंगर क्षेत्र परस्परपणे निवासी करणे, पूररेषेच्या आखणीत हेराफेरी, वॉटर बॉडीज व नाले गायब करणे, महानगरपालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध औद्योगिक क्षेत्राचे निवासीकरण, अनावश्यक आरक्षणे आणि अस्तित्वातील बांधकामांवर आरक्षणे टाकणे यासारख्या अनेक बेकायदेशीर बाबींमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर हा प्रारूप सुधारित विकास आराखडा तातडीने रद्द करण्याची मागणी करत आहे.

या जनविरोधी आराखड्याविरोधात नागरिकांनी मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होऊन आपल्या हक्कांसाठी आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवाज उठवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर वतीने करण्यात येत आहे. मोर्चा शगुन चौक, पिंपरी येथून पुणे-मुंबई महामार्गाने महापालिका भवनावर धडकणार आहे.

मोर्चा गुरुवार दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी स. १०.३० वा शगुन चौक, पिंपरी येथून पुणे-मुंबई महामागनि महापालिका भवनावर धडकणार आहे.


सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष योगेश बहल, मा.नगरसेवक अजित गव्हाणे, मा.विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राहुल भोसले, मयूर कलाटे, कार्याध्यक्ष शाम लांडे, फजल शेख, पंकज भालेकर,प्रभाकर वाघेरे, माजी नगरसेविका माया बारणे, प्रकाश सोमवंशी, सतीश दरेकर,जगन्नाथ साबळे, मायाला खत्री,संजय उदावंत, रवींद्र ओव्हाळ, अक्षय माच्छरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 72
Tags: #ajitgavhane #rashtrwadi #yogesh behel Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: श्री शिव छत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक लॅब माध्यमातून मुंबई येथे झालेल्या रोबोटिक मॉडेल स्पर्धेमध्ये केली अनोखी कामगिरी
Next: चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या शनाया सोनवणेची सुवर्ण कामगिरी!

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.