


संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड, ता. २२: संत तुकाराम नगर परिसरातील पुढील ठिकाणी कित्येक दिवसांपासून खुलेआम सिगारेट, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे, यावर कायदेशीर कडक कारवाईची मागणी पोलीस निरीक्षक, संत तुकारामनगर, यांच्याकडे संतोष देवीदास म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष – धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, यांनी केली आहे.
1. भारतीय जैन संघटना (BJS) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाजवळ
2. YCM हॉस्पिटलच्या मुख्य गेट परिसरात
3. DY पाटील हॉस्पिटलच्या आजूबाजूला
या परिसरात विद्यार्थी, रुग्ण, महिला व नागरिक मोठ्या संख्येने ये-जा करतात. अशा ठिकाणी व्यसनजन्य पदार्थांची विक्री ही समाजासाठी अत्यंत घातक असून कायद्यानुसार गुन्हा आहे.
✅ कायद्याचे संदर्भ:
- COTPA कायदा, 2003 – कलम 6(b):
शैक्षणिक संस्था व रुग्णालयाच्या १०० मीटर परिसरात सिगारेट, गुटखा विक्रीस सक्त मनाई आहे.
उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक व गुन्हेगारी कारवाई केली जाऊ शकते. - IPC कलम 268:
सार्वजनिक त्रासदायक कृत्य (Public Nuisance) - IPC कलम 188:
सरकारी आदेशाचे उल्लंघन - FSSAI कायदा:
आरोग्याला अपायकारक पदार्थांची विक्री निषिद्ध
🛑 मागणी:
आपण वरील सर्व ठिकाणी तपासणी करून दोषी विक्रेत्यांवर त्वरित व कठोर कारवाई करावी. तसेच हे परिसर “धूम्रपान व तंबाखूमुक्त क्षेत्र” म्हणून घोषित करून तिथे नियमित पोलीस गस्त ठेवावी, ही आमची नम्र विनंती आहे.
– संतोष देवीदास म्हात्रे, संस्थापक अध्यक्ष – धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, संत तुकाराम नगर, पिंपरी-चिंचवड

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
