Skip to content
17/04/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • ‘धर्मांतरण’ प्रकरणी दोषी संस्थांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘धर्मांतरण’ प्रकरणी दोषी संस्थांवर कारवाई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

suwarna gaware 21/07/2025
d661dffb-516c-49da-8f7a-c31c3b958ecf
Spread the love

चंद्रपूर, बीड, मुंबई, भिवंडी, पुण्यासह पिंपरी चिंचवड मधील प्रश्न विधिमंडळात मांडले – आ. उमाताई खापरे

पिंपरी, पुणे (दि. २१ जुलै २०२५) पिंपरी चिंचवड शहरातील पवित्र इंद्रायणी, पवना आणि मुळा नदी पात्रात काही विकसक भराव टाकून जमीन तयार करून तेथे अनधिकृत बांधकामे करत आहेत. त्यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन प्रदूषण व पर्यावरण संतुलनाचा गंभीर प्रश्न होत आहे. येथे नदी सुधार प्रकल्प राबवून या नद्या पर्यावरण मुक्त करण्यासाठी शासन काय प्रयत्न करीत आहे.

तसेच केडगाव, तालुका दौंड येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेमध्ये दाखल झालेल्या अनाथ मुलींवर तसेच अशा इतर संस्थांमध्ये ख्रिचन धर्म स्वीकारण्यासाठी मुलींवर अत्याचार केले जातात त्यांची मान्यता रद्द करणार का असा प्रश्न देखील पुन्हा एकदा आमदार उमाताई खापरे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या पावसाळी अधिवेशनात विचारला होता. तसेच भिवंडी मध्ये असणाऱ्या गोदामांना वारंवार आग लागण्याच्या दुर्घटना घडतात याबाबत शासनाचे धोरण काय असाही प्रश्न आ. उमा खापरे यांनी विचारला होता.


त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले की, सरसकट सर्व संस्थांवर कारवाई करता येणार नाही. परंतु तक्रार आल्यास चौकशी करून कारवाई केली जाईल तसेच पंडिता रमाबाई मुक्ती मिशन या संस्थेच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या महिला अधिकाऱ्यांकडून एक महिन्यात अहवाल घेऊन संस्थादोषी असल्यास मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल.

भिवंडी येथील गोदामांविषयी फडणवीस यांनी सांगितले की, समृद्धी महामार्ग लगत असणाऱ्या जागेमध्ये उद्योग विभागाच्या वतीने लॉजिस्टिक पार्क उभारले जाईल त्या ठिकाणी सेवा सुविधा देऊन गोदामे स्थलांतरित करण्यात येतील.


तसेच चंद्रपूर वर्धा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोळसा खाण, सिमेंट, स्टील उद्योग व औष्णिक विद्युत प्रकल्पामुळे येथील परिसरात प्रदूषणात वाढ झाली असून नागरिकांच्या जीवनात धोका निर्माण झाला आहे. अक्कापुर एमआयडीसी येथे उद्योग सुरू करण्यासाठी ज्या उद्योजकांनी जागा घेतल्या आहेत परंतु अद्यापही प्रकल्प सुरू केले नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार. तसेच बीड जिल्ह्यातील अनेक महिलांचे विनाकारण गर्भाशय काढण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये सरकारी शाळांमधील विद्यार्थी गळतीचे प्रमाण वाढत आहे.

आदिवासी भागामध्ये माता व नवजात बालकांमध्ये कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सुरू असणाऱ्या प्रकल्पांच्या जागेमध्ये असणारी झाडे तोडल्यानंतर त्यांचे पुनर्रोपण करावे, आदिवासी भागात रुग्णांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्याव्यात. झोमॅटो स्विगी सारख्या कंपन्यांकडून घरपोच खाद्यपदार्थ व इतर वस्तू देण्याची सेवा दिली जाते परंतु यामध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची तपासणी तसेच अशा काही फ्रॉड कंपन्यांकडून होणारी नागरिकांची फसवणूक कशी रोखणार असे राज्यस्तरावरील प्रश्न आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत उपस्थित केले.


तसेच पिंपरी चिंचवड शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे, पिंपरीत असणारे अण्णासाहेब मगर स्टेडियमला निधी उपलब्ध करून द्यावा, मिलिंद नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये दुबार घरे दिली गेली आहेत. त्याची चौकशी करावी.

पिंपरी चिंचवड विकास आराखडा रद्द करावा अनेक ठिकाणी नागरिकांच्या अधिकृत घरांवर आरक्षण टाकण्यात आले आहे तसेच बोपखेल मध्ये एक किलोमीटरच्या परिघात शाळा असताना देखील खाजगी जागेवर शाळेचे आरक्षण टाकण्यात आले आहे ते रद्द करावे असे पिंपरी चिंचवड शहराशी संबंधित प्रश्न देखील उमा खापरे यांनी सभागृहात उपस्थित केले.

शासकीय सेवेतील खेळाडूंना क्रीडा क्षेत्राची जबाबदारी द्यावी. अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अतिरिक्त सवलती देऊन गोशाळेत भाकड गाईंचे संगोपन करणाऱ्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशा विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणली. तसेच लाडक्या बहिणी योजनेसाठी मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी २६०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार देखील आमदार उमा खापरे यांनी मानले.

उमा खापरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्री उदय सामंत, पंकजा मुंडे, दादा भुसे, माधुरीताई मिसाळ, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, प्रकाश आबिटकर तसेच डॉ. पंकज भोयर या मंत्र्यांनी उत्तरे दिली.


suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 45
Tags: #bjp #devendra phadanvis #uma khapre Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा, टॅक्सी, कॅब चालकांच्या प्रश्नांसाठी “जनसंवाद अभियान” सुरू
Next: राजर्षी शाहू महाराज विद्यालयमध्ये वृक्षारोपण संपन्न

Related Stories

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4 1

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

17/04/2026
उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश.. f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d 2

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

16/04/2026
वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे 3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28 3

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

16/04/2026
डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

13/04/2026
शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ? IMG_5588 5

शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

10/04/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

e71e5c5f-b1b6-41dd-a3b2-42a51bb41da4
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन

suwarna gaware 17/04/2026
f60baa66-a41c-442e-a0c2-25b0a838465d
  • Daily Breaking News
  • Education

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..

suwarna gaware 16/04/2026
3215eb5b-9fb6-43ab-9782-33288c742e28
  • Daily Breaking News

वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे

suwarna gaware 16/04/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education
  • Health

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार

suwarna gaware 13/04/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांचे ड प्रभागावर आंदोलन
  • उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही राखली..पिंपळे सौदागरच्या ‘Challenger Public School’ च्या विद्यार्थ्यांचे दहावी सीबीएसई परिक्षेत घवघवित यश..
  • वाकडमधून थेट हायवे कनेक्टिव्हिटी देणाऱ्या लिंक रस्त्यांना गती; ट्रॅफिक प्रश्न सोडवण्यासाठी राहुल कलाटे यांचे नियोजन; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या १०० दिवसांच्या संकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्णत्वाकडे
  • डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २८ वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळलेल्या द्विपक्षीय फिओक्रोमोसायटोमा या दुर्मिळ आजाराचे यशस्वी उपचार
  • शालेय साहित्य वाटप विद्यार्थी हितासाठी ? का अधिकारी आणि ठेकेदार यांच्या फायद्यासाठी ?

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.