Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • तीन लांखाहून अधिक नागरिकांनी भरला ऑनलाइन कर
  • Daily Breaking News

तीन लांखाहून अधिक नागरिकांनी भरला ऑनलाइन कर

suwarna gaware 17/07/2025
IMG_0714
Spread the love

पिंपरी-चिंचवडकरांचा ऑनलाइन मालमत्ता कर भरणा मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, १७ जुलै २०२५ :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली मोहिमे अंतर्गत शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरताना दिसत आहेत. १ एप्रिल ते १६ जुलै या कालावधीत तब्बल ४ लाख २८ हजार मालमत्ताधारकांनी मिळून एकूण ५४४ कोटी रुपयांचा कर भरणा केला आहे.

महापालिकेच्या वतीने १ एप्रिल ते ३० जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना १० टक्के सवलतीची सुविधा देण्यात आली होती. या सवलतीचा लाभ ३ लाख २३ हजार २३९ मालमत्ताधारकांनी घेतला. तसेच ज्या मालमत्ताधारकांना यावेळी सवलत घेता आली नाही, त्यांच्या सोयीसाठी महापालिकेने १ जुलै ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना ४ टक्के सवलत जाहीर केली आहे. नागरिक विविध पर्यायांचा वापर करून कर भरणा करत आहेत.

ऑनलाइन प्रणाली, कॅश काऊंटर, ईडीसी, आरटीजीएस, डिमांड ड्राफ्ट, BBPS अशा माध्यमातून कर भरणा सुरू आहे.

यामध्ये – ऑनलाइन : ३९४ कोटी ३३ लाख
रोख रक्कम : ३२ कोटी ७० लाख ८० हजार धनादेश : २५ कोटी ६१ लाख २३ हजार
ईडीसी : ६ लाख ६ हजार
आरटीजीएस : २४ कोटी ६२ लाख ८५ हजार डीडी : ७४ लाख ३२ हजार
BBPS : १७ लाख ८३ हजार मालमत्ता कर

संकलनासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. आर्थिक वर्ष २०२५-२६ वसुली मोहीम हाती घेण्यात आली असून, नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहे. चौकट- धनादेश अनादर झाल्यास कारवाई दरम्यान, अनेक मालमत्ताधारकांनी धनादेशाद्वारे कर भरणा केला असला तरी काही धनादेश वटले नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून संबंधित मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करणे, नळजोड तोडणे आदी कठोर पावले उचलली जात आहेत.

मालमत्ता कर वसुलीसाठी नागरिकांशी थेट संवाद पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाने कर वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, नागरिकांना कर सवलतीची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संपर्क साधला जात आहे.१८ विभागीय कार्यालयांमार्फत लिपिक, गट लिपिक, सहायक मंडलाधिकारी आणि इतर एकूण २० कर्मचाऱ्यांची टीम टेलिकॉलिंगच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधत आहे. या संवादातून नागरिकांना मालमत्ता कर सवलतीची माहिती दिली जात असून, वेळेत कर भरण्याचे आवाहन केले जात आहे. तसेच जे मालमत्ताधारक थकबाकीदार आहेत किंवा चालू वर्षात अद्याप कर भरलेला नाही, त्यांना टेलिकॉलिंग, मेसेज, VMD तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे. महापालिकेच्या या विशेष मोहिमेमुळे कर संकलनात लक्षणीय वाढ होताना दिसत आहे.

ऑनलाइन कर भरणा मोहिमेला नागरिकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे, तो खरोखरच प्रशंसनीय आहे. आम्ही नागरिकांना अधिकाधिक सवलतीसह ऑनलाइन कर भरण्यासाठी प्रोत्साहन देत राहू. तीन लाख पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाइन कर भरला आहे हे अत्यंत समाधानकारक आहे. महापालिकेच्या ऑनलाइन सेवेमुळे नागरिकांना घरबसल्या कर भरण्याची सुविधा मिळते. यापुढेही आम्ही अशा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत राहू.
प्रदीप जांभळे पाटील – अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

धनादेश अनादर झाल्यास कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतलाआहे.थकबाकीदारांविरोधात मालमत्ता जप्ती,नळकनेक्शन खंडित करणे अशी कटू कारवाई करत आहेत. अशी कटू कारवाई टाळून नागरिकांनी वेळेत कर भरावा

अविनाश शिंदे – सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 75
Tags: #shekhar singh #tax Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: ओला, उबेर, रॅपिडो या बेकायदा कंपन्याच्या माध्यमातून होणारी पिळवणुकी विरोधात आझाद मैदान येथे आमरण उपोषण: केशव क्षीरसागर
Next: ‘सायबर युगातील पत्रकारिता – मूल्य, आव्हाने आणि संधी’ या विषयावर मीडिया सेमीनार

Related Stories

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 1

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 2

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 3

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 4

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026
अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा 061d33f8-cf6d-4587-af21-29364f24b0ff 5

अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

30/08/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
  • अपात्र ठरवलेल्या लाडक्या बहिणींचा मंगळवारी मुंबईत आक्रोश मोर्चा

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.