


पिंपरी चिंचवड, दिनांक: ११ जुलै, –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे खासगीकरण करून त्या आकांक्षा फाउंडेशन या संस्थेला ४० कोटी ५३ लाख ७५ हजार रुपये सार्वजनिक निधी देऊन चालविण्याचा निर्णय जनविरोधी, अपारदर्शक आणि शिक्षणाच्या हक्काच्या विरोधात असल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) चे वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांनी दिली.

त्यांनी आज महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी केली असून, अन्यथा महापालिकेवर तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.महापालिकेच्या खालील शाळांचा समावेश या ठेकेदारी धोरणात करण्यात आला आहे:श्रीमती अनुसया नामदेव वाघेरे शाळा, पिंपरीछत्रपती शाहू महाराज शाळा, कासारवाडीकै. दत्तोबा रामचंद्र काळे शाळा, काळेवाडीमहापालिका शाळा, बोपखेलसावित्रीबाई फुले शाळा, मोशीमहापालिका शाळा, दिघीया शाळा पूर्वी CSR निधीच्या माध्यमातून आकांक्षा फाउंडेशन चालवत होती. आता CSR निधी अपुरा असल्याचे कारण देत, त्याच संस्थेला सार्वजनिक निधी वापरून काम देणे हे आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयाला वाव देणारे आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेमध्ये फक्त आकांक्षा फाउंडेशननेच सहभाग घेतला होता, आणि ही संपूर्ण प्रक्रिया ही एकपक्षीय, अपारदर्शक आणि हेतुपुरस्सर वाटते, असेही धम्मराज साळवे यांनी म्हटले आहे.शाळांचे खासगीकरण हे शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या विरोधात असून, यामुळे गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. महापालिकेच्या निर्णय प्रक्रियेत स्थानिक जनप्रतिनिधी, पालक वर्ग आणि शिक्षक संघटनांचा सहभागच घेतला गेलेला नाही, ही बाब अधिक धक्कादायक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
मागण्या:सहा शाळांचे खासगीकरण तात्काळ थांबवावेआकांक्षा फाउंडेशनला दिलेला ठेका रद्द करावानिविदा प्रक्रियेबाबत स्वतंत्र चौकशी करून अहवाल जनतेसमोर सादर करावाभविष्यात अशा शैक्षणिक निर्णयांमध्ये जनसहभाग अनिवार्य करावाजर मागण्या मान्य न झाल्यास, लवकरच शिक्षक, पालक व सामाजिक संघटनांसह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
धम्मराज नवनाथ साळवे
वरिष्ठ उपाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️