


पुणे, ०९ जुलै २०२५: डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणेयांनी पॅन्क्रिएटिक (अग्न्याशयाचे) आजारांच्या निदान व उपचारासाठी समर्पित असलेले आधुनिक आणि सर्वसमावेशक असे एकाच छताखालील केंद्र सुरू केल्याची घोषणा केली आहे. भारतात पॅन्क्रिएटिक आजारांवर अधिक प्रभावीपणे उपचार मिळावेत यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रुग्णकेंद्रित दृष्टिकोन आणि नवोन्मेषात्मक उपायांवर भर देत हे हॉस्पिटल नेहमीच वैद्यकीय क्षेत्रात आघाडीवर राहिले आहे

नवीन सुरू करण्यात आलेले हे केंद्र इंटिग्रेटेड सेंटर फॉर पॅन्क्रिएटिक डिसीजेस (ICPD) अंतर्गत कार्यरत असून, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असून ती तीव्र व दीर्घकालीन पॅन्क्रियाटायटिस, पॅन्क्रियासचा कॅन्सर आणि पॅन्क्रियाटिक सिस्ट्स यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांचे लवकर निदान, अत्याधुनिक उपचार व सर्वांगीण काळजी देणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
या केंद्राचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्णाच्या संपूर्ण उपचार प्रक्रियेला एकत्रित व समन्वित पद्धतीने हाताळणारी टीम. यामध्ये अनुभवी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, पॅन्क्रिएटिक सर्जन, ऑर्गन ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट व एंडोक्रिनोलॉजिस्ट यांचा समावेश आहे. या सर्व तज्ज्ञांचे समन्वयित प्रयत्न रुग्णांसाठी केंद्रबिंदू असलेल्या उपचारपद्धतीची खात्री करतात.
उपचारांव्यतिरिक्त, या युनिटमध्ये विशेषज्ञ सल्लामसलत, मल्टिडिसिप्लिनरी बोर्ड मिटिंग्स घेण्यात येणार आहेत ज्या द्वारे गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्ये एकमताने निर्णय घेतला जाईल. तसेच रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी माहितीपूर्ण व शैक्षणिक उपक्रम राबवले जातील, जेणेकरून प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक, जाणीवपूर्वक आणि योग्य मार्गदर्शन मिळेल.
या केंद्राच्या उद्घाटनाद्वारे डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणेयांनी सुपर स्पेशालिटी केअरमध्ये नवे मापदंड प्रस्थापित करत असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे—क्लिनिकल उत्कृष्टता आणि सहानुभूतीपूर्ण सेवा या दोघांचा संगम एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) प्र-कुलपती, मा. डॉ. (सौ.) भाग्यश्री पाटील म्हणाले, “कोणत्याही आरोग्य संस्थेची खरी ताकद ही व्यापक, सहानुभूतीपूर्ण आणि वेळेवर उपचार सेवा देण्याच्या क्षमतेत असते. पॅन्क्रियाटिक आजारांसाठी एकाच छताखाली उभारण्यात आलेल्या या प्रगत केंद्राच्या माध्यमातून आम्ही लवकर निदान, एकात्मिक उपचार आणि सर्वांगीण रुग्णसहाय्याच्या दिशेने एक परिवर्तन घडवणारे पाऊल टाकत आहोत.
अचूकता, सुलभता आणि रुग्णकल्याण यांना प्राधान्य देणारी जागतिक दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे उत्तम उदाहरण आहे.”
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार, मा. डॉ. यशराज पाटील यांनी सांगितले,
“हे महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे. हे टप्पे आमच्या अत्याधुनिक आरोग्यसेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहेत. पॅन्क्रियाटिक समस्या, विशेषतः वय वाढत असताना पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतात आणि त्यासाठी वेळेत व समन्वयाने उपचार करणे गरजेचे असते.
या प्रगत केंद्राच्या माध्यमातून आम्ही सर्व वयोगटातील रुग्णांसाठी एकाच छताखाली अखंड उपचार सेवा देऊ शकतो. आमचे कार्य करुणेवर आधारित असून, उत्तम आणि दर्जेदार उपचार देणे हेच आमचे ध्येय आहे.”
डॉ. देबब्रत बॅनर्जी, मेडिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी – विभागप्रमुख, डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “पॅन्क्रियाटिक केअरसाठी हे प्रगत केंद्र सुरू करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. विशेषतः दूरवरून येणाऱ्या रुग्णांसाठी हे केंद्र फार उपयोगी ठरणार आहे.
एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध असल्यामुळे वेळेत निदान करणे, योग्य उपचार देणे आणि संपूर्ण सहाय्य पुरवणे अधिक सुलभ होते. प्रत्येक रुग्णाच्या आरोग्याची आणि कल्याणाची काळजी घेणारी दर्जेदार व सुलभ आरोग्यसेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
