


पिंपरी चिंचवड, दि ०६: आषाढी एकादशीचे औचित्य साधून चॅलेंजर पब्लिक स्कूल पिंपळे सौदागर येथे भक्तीभावात व संस्कारमय वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या वंदनगीताने झाली. त्यानंतर पंढरपूरच्या वारीचा महिमा सांगणारे मार्गदर्शन शाळेचे संचालक श्री संदीप काटे सरांनी केले.

शाळेच्या शिक्षिका अभिलाषा सोनार मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली विध्यार्थ्यांनी भक्त पुंडलिक हे नाटक साजरे केले. तसेच विद्यार्थ्यांनी फुगड्या, भारुड, अभंगगायन, तसेच विठ्ठल-रुखमाईच्या झाकी सादर करून वारकरी संप्रदायातील संस्कृतीचे दर्शन घडवले. शाळेच्या प्रांगणात “वारी” चे अनुकरण करत विद्यार्थ्यांनी टाळ, मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा माऊली तुकाराम ” च्या जयघोषात वारी केली.
तसेच शाळेच्या उपसंचालिका सौ अनिता काटे मॅडम यांनी देखील विध्यार्थ्यांन सोबत वारीत सहभाग घेतला. त्याच बरोबर त्यांनी विध्यार्थ्यांना “भक्त पुंडलिका” ची गोष्ट सांगितली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले.
पिंपळे सौदागर गावच्या वारी मध्ये शाळेच्या विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्यावेळी श्री शत्रुघ्न काटे व शिव साई लेण चे सर्व मंडळी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागाने अत्यंत उत्साहात पार पडला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️