


पिंपरी चिंचवड, ता. ७: ऐश्वर्यम सोसायटीच्या बाजूला तसेच आकुर्डी मंडई व मोहन नगर येथील कोकिळ हाईटॖस शेजारी तसेच चिंचवड स्टेशन रोडवरील धोकादायक झाड कोसळल्याच्या घटना ताज्या असताना बुधवार ०२/०७/२०२५ रोजी चिंचवड स्टेशन आकुर्डी रोड दरम्यान PMPML च्या बसवर झाड कोसळले.

सुदैवाने कोणत्याही प्रवाशांना काही झालं नाही पण एक प्रवासी जखमी झाला. रस्त्यावरचे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाले होते आणि प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. केवळ अग्निशामक विभागाने वेळेवर दाखविलेली तत्परता आणि सज्जता यामुळे मोठा अनर्थ टळला. महिन्याभरात एकूण चार मोठे धोकादायक वृक्ष रहदारीच्या रस्त्यावरती कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे जरी असले तरी असुरक्षित असल्याची भावना नागरिकांच्या मनात आहे.
या सर्व घटना प्रभाग क्रमांक 14 अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत येतात.
अशा या घटना वारंवार होत असल्याने वृक्ष संवर्धन विभागाला धोकादायक झाड़ांबदल प्रत्येक वेळेस पत्र दिले असून त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही.
केवळ ४ कंत्राटी कर्मचारी एका क्षेत्रिय कार्यालया कडे उपलब्ध आसल्याचे कारण पूढ़े करत धोकदायक झाड़ छाटता येत नाही हे उत्तर वृक्ष संवर्धन प्रशासनाकडून देण्यात येते. PMPL बस मधे प्रवासी मोठ्या संख्येने असतात आणि अपघात झाला असता तर याला जबाबदार कोण असते.
कृपया आपण तातडीने याची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी गणेश लंगोटे, उपाध्यक्ष, भा.ज.पा
पिंपरी चिंचवड़ शहर जिल्हा यांनी आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️