


पिंपरी चिंचवड, ता. ५: विद्यार्थ्यांनी हातामध्ये टाळ, डोईवर तुळशी आणि मुखी विठ्ठलाचे नाम तसेच मनामध्ये भाव, अंतःकरणामध्ये भक्ती आणि मुखी विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत थेरगाव परिसराममधून दिंडी सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेतला. मुलांनी विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या वेशभूषा करत संतांच्या अभंगांचे सादरीकरण केले. टाळ मृदुंगाच्या तालावर फुगडीचाही आनंद घेतला.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तुकाराम गुजर, मानद सचिव कांतीलाल गुजर, मुख्याध्यापक महेंद्र पवार, नाना शिवले, पर्यवेक्षक विजय जाधव, प्रवीण कुऱ्हाडे, संभाजी शेलार, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनीता गोरे, ज्योती धुरपते आदी उपस्थित होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करण्यात आले व विठ्ठल मंदिरापर्यंत मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन गौतम दळवी, मोहन परहर, दिलीप माळी, भिमराज शिरसाठ, ज्ञानेश्वर बोरसे, योगिता काळोखे, सोनाली वाघमारे, सुमिता सुकाळे यांनी केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️