Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी, ९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली!
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महापालिकेची ऐतिहासिक कामगिरी, ९० दिवसांमध्ये केली ५२२ कोटींची कर वसुली!

suwarna gaware 01/07/2025
IMG_0714
Spread the love

पहिल्या तिमाहीत ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी जमा केला कर

पिंपरी, १ जुलै २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजेच अवघ्या ९० दिवसांमध्ये तब्बल ५२२ कोटी ७२ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच पहिल्या तिमाहीत कर वसुलीचा पाचशे कोटींचा आकडा पार करून ऐतिहासिक कामगिरी महापालिकेने केली आहे.

पहिल्या तिमाहीत नागरिकांनी जास्तीतजास्त मालमत्ता कर भरावा, यासाठी कर संकलन विभागाने ३० जून २०२५ पर्यंत विविध सवलती जाहीर केल्या होत्या. या सवलतींना भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे शहरातील नागरिकांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९६६ कोटींची मालमत्ता कर वसुली केली होती. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये हा आकडा पार करण्यासाठी महापालिकेने सुरुवातीपासून नियोजन केले आहे. पहिल्या तिमाहीमध्येच जास्तीतजास्त कर वसूल व्हावा, यासाठी ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन कर भरणाऱ्यांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यासह विविध सवलती महापालिकेने जाहीर केल्या होत्या.

या सवलतींना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १ एप्रिल २०२५ ते ३० जून २०२५ या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत तब्बल ४ लाख १२ हजार मालमत्ताधारकांनी कर भरून विविध सवलतींचा लाभ घेतला आहे.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत विक्रमी प्रतिसाद

आर्थिक वर्ष २०२१-२२ ते आर्थिक वर्ष २०२५-२६ या पाच आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होणाऱ्या कर संकलनाची आकडेवारी पाहता यंदाच्या वर्षी पहिल्या तिमाहीत कर संकलनात विक्रमी वाढ दिसून आली आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये पहिल्या तिमाहीत १७१.८५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये २५३.६५ कोटी रुपये, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये पहिल्या तिमाहीत ४५४ कोटी रुपये तर २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीत ४४० कोटी रुपयांची कर वसुली झाली होती. यंदा मात्र ३० जून २०२५ पर्यंत ५२२ कोटी ७२ लाखांची वसुली झाली आहे.
…..
सवलतीचा लाभ घेतलेले मालमत्ताधारक (एकूण लाभार्थी संख्या)

महिला मालमत्ताधारक: १७ हजार ४५९

माजी सैनिक: ४ हजार २३

दिव्यांग मालमत्ताधारक: १ हजार ८९७

शौर्यपदधारक: ९

पर्यावरणपूरक मालमत्ता: २४ हजार ८६९

आगाऊ भरणा : ४० हजार ९३४

ऑनलाइन कर भरणा करणारे: ३ लाख २३ हजार २३९

एकूण लाभार्थी संख्या : ४ लाख १२ हजार ४३०

…….
वर्षनिहाय पहिल्या तिमाहीतील मिळकत कर संकलन ( कोटीत)

२०२१-२२ – ₹ १७१.८५ कोटी

२०२२-२३ – ₹ २५३.६५ कोटी

२०२३-२४ – ₹ ४५४.४३ कोटी

२०२४-२५ – ₹ ४४०.३२ कोटी

२०२५-२६ – ₹ ५२२.७२ कोटी (विक्रम)
……
विभाग कार्यालयानिहाय झालेले कर संकलन

वाकड – ६५ कोटी ११ लाख

थेरगाव – ४७ कोटी ५२ लाख

चिखली – ३९ कोटी ३५ लाख

कास्पटे वस्ती – ३७ कोटी ६० लाख

किवळे – ३४ कोटी २३ लाख

भोसरी – ३३ कोटी ९५ लाख

चिंचवड – ३३ कोटी ३ लाख

पिंपरी वाघेरे – ३२ कोटी ८४ लाख

मोशी – ३० कोटी ५३ लाख

सांगवी – २७ कोटी ९ लाख

मनपा भवन – २८ कोटी २२ लाख

आकुर्डी – २४ कोटी ३३ लाख

फुगेवाडी दापोडी – १८ कोटी ४९ लाख

चऱ्होली – १६ कोटी ३७ लाख

निगडी प्राधिकरण – १२ कोटी ७७ लाख

तळवडे – १२ कोटी ९० लाख

दिघी बोपखेल – १७ कोटी ८४ लाख

पिंपरी नगर – ४ कोटी २४ लाख
……….
कर संकलनाची वैशिष्ट्ये

महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देताना ३ लाख २३ हजार २३९ नागरिकांनी तब्बल ३८० कोटींपेक्षा जास्त कर ऑनलाइन पद्धतीने भरला आहे. ही संख्या जवळपास एकूण कर भरणाऱ्यांच्या तुलनेत ७३ टक्के आहे.

१८ विभागीय कार्यालयांच्या कॅश काऊंटरद्वारे तब्बल ३० कोटी ६३ लाख रुपयांचा कर भरणा केला आहे.

३० जून २०२५ या एका दिवसात ३४ कोटी ४९ लाख रुपयांचा भरणा झाला.

पहिल्या तिमाहीत ऑनलाइनद्वारे ३८० कोटी ४८ लाख रुपये, रोख स्वरुपात ३० कोटी ६३ लाख, धनादेशाद्वारे २३ कोटी ६६ लाख आरटीजीएसद्वीरे २३ कोटी ५३ लाख मालमत्ता भरण्यात आला आहे.

सीएचडीसी प्रकल्पामुळे कर आकारणीमध्ये सुलभता, पारदर्शकता आणि गतिमानता आणणे सहज शक्य झाले. याद्वारे करवसुली, थकबाकीदारांच्या माहितीचे विश्लेषण होऊन वस्तुस्थिती समोर आली.

करसंकलन विभागाने ‘डेटा’ विश्लेषण करून त्यानुसार एसएमएस, टेलिकॉलिंग, होर्डिंग, सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
………

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाने केलेले नियोजन, सीएचडीसी प्रकल्प अंतर्गत डेटा विश्लेषण करून त्याआधारे विविध माध्यमातून केलेली जनजागृती मोहिम, बचत गटांमार्फत घरोघरी पोहोचवण्यात आलेली मालमत्ता करांची बिले, कर संकलन विभागाच्या विविध सवलतींना नागरिकांना दिलेला प्रतिसाद, यासर्वांमुळे यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत ५२२ कोटींचा कर वसुलीचा टप्पा पार झाला आहे. ही कामगिरी करण्यासाठी महत्त्वाचे योगदान असणाऱ्या करदात्यांसह सर्व विभागीय अधिकारी, कर्मचारी, बचत गटातील महिला यांचे मी मन:पूर्वक अभिनंदन करतो.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका
    ……
    कोट

पहिल्या तिमाहीत झालेली विक्रमी वसुली ही केवळ महसूल संकलनाची आकडेवारी नाही, तर शहरवासीयांच्या विश्‍वासाचे प्रतिबिंब आहे. येत्या काळातही पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही ही कामगिरी अधिक उंचावू. यंदाच्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचे सर्वात जास्त मालमत्ता कर वसुली होईल, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यादृष्टिने पहिल्या तिमाहीमधील टप्प्या आम्ही पूर्ण केला आहे.

  • प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
    ………
    कोट

मालमत्ता कर वसुलीसाठी सुरुवातीपासूनच जनजागृतीवर जास्तीतजास्त भर देण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी मालमत्ताधारकांना कर भरता यावा, यासाठी १८ विभागातील कर संकलन कार्यालय सुरू ठेवण्यात आली होती. प्रत्येक विभागाने सहकार्य करून हे संकलन साध्य केले, याचा विशेष आनंद आहे.

  • अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
    ……
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 59
Tags: #property tax #shekhar singh Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महापालिका १ जुलैपासून मालमत्ता कर वसुलीसाठी राबवणार व्यापक मोहीम
Next: महापालिकेच्या अग्निशामक जवानांमुळे मुक्या जीवाला मिळाले जीवनदान!

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.