


भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात ‘बुद्धिजीवी संमेलन’ मोठ्या उत्साहात संपन्न…

पिंपरी चिंचवड, ता. ३०: “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाखाली भारताने केवळ प्रगतीच केली नाही,तर जागतिक पटलावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘संकल्प ते सिद्धी’ हे अभियान म्हणजे या ११ वर्षांच्या अतुलनीय वाटचालीचा गौरव आहे.” “आज भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे,पायाभूत सुविधांमध्ये क्रांती घडत आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनात सकारात्मक बदल होत आहेत.
शिक्षण,आरोग्य, सुरक्षा आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सरकारने प्रत्येक स्तरावर काम केले आहे. ‘सबका साथ, सबका विकास,सबका विश्वास,सबका प्रयास’ हे केवळ एक घोषवाक्य नसून, ते मोदी सरकारच्या कारभाराचे आणि भारताच्या विकासाचे मूलभूत तत्त्व आहे. पुढील काळातही देशाची ही विकासाची घोडदौड अशीच वेगाने सुरू राहील आणि भारत एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री श्री प्रकाशजी जावडेकर यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या ११ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळावर प्रकाश टाकतांना ते बोलत होते.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राष्ट्रीय समितीने सुरू केलेल्या ‘संकल्प ते सिद्धी’ अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी,पिंपरी- चिंचवडचे शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वात बुद्धीजीवी संमेलन’ शनिवारी,सायंकाळी हॉटेल कलासागर,कासारवाडी,येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री प्रकाशजी जावडेकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले.भारताच्या विकासाची वाटचाल आणि पुढील दिशा यावर विचारमंथन करण्यासाठी आयोजित या संमेलनाला डॉक्टर,वकील,सीए,अभियंता अशा प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून आपली मते व्यक्त केली.
भाजपा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू ) काटे, आमदार तथा बुद्धिजीवी संमेलनाचे आयोजक श्री महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धिजीवी संमेलनाचे संयोजक ऍड.श्री गोरखनाथ झोळ,सहसंयोजक सीए श्री बबन डांगले,श्री दीपक भंडारी,श्री चैतन्य पाटील,श्री अमेय देशपांडे व डॉ. श्री प्रताप सोमवंशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे, आमदार उमाताई खापरे,माजी खासदार श्री अमरजी साबळे,प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री सदाशिव खाडे,माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी महापौर श्री राहुल जाधव,दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष श्री राजेश पिल्ले,प्रदेश सदस्य श्री मोरेश्वर शेडगे,श्री महेश कुलकर्णी, सरचिटणीस श्री संजय मंगोडेकर,श्री विजय उर्फ शीतल शिंदे,श्री अजय पाताडे,शैलाताई मोळक,महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई पालांडे,शहर प्रवक्ते श्री राजू दुर्गे,माजी उपमहापौर श्री केशव घोळवे,माजी नगरसेवक श्री विनायक गायकवाड,श्री शैलेश मोरे,श्री उत्तम केंदळे,श्री सुभाष चिंचवडे,श्री यशवंत भोसले,माजी नगरसेविका योगिताताई नागरगोजे,माधवीताई राजापुरे,निर्मलाताई कुटे, सविताताई खुळे,वैशालीताई खाडेय,भारतीताई विनोदे,मंडल अध्यक्ष श्री मोहन राऊत,ऍड.श्री हर्षद नढे,श्री सनी बारणे,श्री गणेश ढोरे,श्री सोमनाथ तापकीर,ऍड.श्री योगेश सोनवणे,श्री अमोल डोळस,श्री शिवराज लांडगे,श्री अजित बुर्डे,श्री रामदास कुटे,श्री धरम वाघमारे,श्री जयदीप खापरे, श्री मंगेश धाडगे,अनिताताई वाळूंजकर,श्री काळुराम बारणे,श्री विजय फुगे,श्री संजय पटनी, श्री हनुमंत लांडगे,ऍड.श्री सय्यद सिकंदर,श्री माणिकराव अहिरराव,श्री अजित कुलथे,श्री रवी देशपांडे,श्री जवाहर ढोरे,श्री महादेव कवितके,श्री संतोष तापकीर,श्री कैलास कुटे,श्री विशाल वाळुंजकर,श्री सचिन तापकीर,श्री चेतन बेंद्रे,श्री सागर फुगे,श्री कैलास सानप,श्री गणेश ढाकणे,श्री सचिन राऊत,श्री हरीश मोरे,श्री प्रकाश लोहार, श्री राकेश नायर,श्री संजय कणसे,कविता हिंगे, दीपालीताई धनोकार,तेजस्विनीताई दुर्गे, प्रतिभाताई जवळकर, राजश्रीताई जायभाय,आशाताई काळे,पल्लवीताई पाठक,गीताताई महेंद्रू,श्री नंदू भोगले,श्री पोपट हजारे,श्री भूषण जोशी यांच्यासह सर्व आघाड्यांचे पदाधिकारी – कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात देशाने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात मोदी सरकारने बजावलेली भूमिका यावर मान्यवरांनी विचारमंथन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक श्री संजय मंगोडेकर यांनी मांडले.सूत्रसंचालन श्री मोरेश्वर शेडगे यांनी तर आभार श्री राजेश पिल्ले यांनी मानले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
