


प्रभाग ‘ह’ मधील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून विविध समस्या सहन करत आहेत. प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. खालीलप्रमाणे महत्त्वाचे मुद्दे अत्यंत गंभीर असून तात्काळ कार्यवाही अपेक्षित आहे. अशी मागणी संतोष देवीदास म्हात्रे, समन्वयक – पुणे जिल्हा, युवा सेना यांनी ह प्रभाग अध्यक्ष यांच्याकडे केली आहे.

- वल्लभनगर भुयारी मार्गावर गटार उघडे व पाणी साचते आहे – पादचाऱ्यांवर व वाहनचालकांवर सडलेल्या पाण्याचा मारा होतो, अपघात होत आहेत. गटार झाकणे लावण्यात यावीत.
- ड्रेनेज लाईन टाकूनही ब्लॉक्स बसवले नाहीत – २–२ महिने झाले तरी काम अपूर्ण आहे. संपूर्ण व्यवस्था लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी.
- नवीन टाकलेली लाईन निकृष्ट दर्जाची – काम सुरू असतानाच खराब झाले आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पुनर्बांधणी व्हावी.
- झाडांच्या फांद्या वेळेवर छाटल्या जात नाहीत – नागरिकांच्या वाहनांचे नुकसान होते आहे. तातडीने सर्वत्र फांद्या छाटाव्यात.
- दोन ठिकाणी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची गरज – त्वरित पाहणी करून काम मंजूर करण्यात यावे.
- पोलवरील स्ट्रीट लाईट बंद – अनेक ठिकाणी रस्त्यावर अंधार आहे. लाईट्स तातडीने सुरू कराव्यात.
- गार्डनचा मुख्य गेट कायम बंद – नागरिकांना अडथळा होतो आहे. गेट कायम खुला ठेवण्यात यावा.
- रस्ते खणून तसेच ठेवले आहेत – डांबरीकरण न झाल्यामुळे नागरिकांना त्रास होतो आहे. सर्व अपूर्ण रस्त्यांचे काम पूर्ण करण्यात यावे.
- पिण्याचे पाणी गढूळ असून पाण्यात आळ्या सापडल्या आहेत – नागरिकांच्या आरोग्याशी थट्टा होत आहे. शुद्ध पाण्याची त्वरित व्यवस्था व्हावी.
- ७–८ महिने झाले तरी पैसे भरूनही टपरी लायसेन्स मिळालेले नाही – हे दुर्लक्ष निंदनीय आहे. संबंधित विभागाने लायसेन्स तात्काळ वितरित करावे.
वरील सर्व मागण्या अत्यंत गंभीर असून, त्या सोडवण्यासाठी आपल्याकडून तात्काळ हालचाल अपेक्षित आहे. अन्यथा नागरिकांच्या भावना लक्षात घेता आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची वेळ येईल.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
