


पिंपरी, पुणे दि. ५ –:जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, पिंपरी, पुणे येथील सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमास कुलपती डॉ. पी. डी. पाटील सर, प्र-कुलपती सौ. भाग्यश्री ताई पाटील मॅडम, कुलगुरु डॉ. एन. जे. पवार सर, प्र-कुलगुरु डॉ. स्मिता जाधव मॅडम आणि कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दंत महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हे उपक्रम यशस्वीपणे पार पडले. यंदाच्या जागतिक तंबाखूविरोधी दिनाची संकल्पना होती –
“Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products”
(आकर्षणाचा मुखवटा उतरवताना: तंबाखू व निकोटीन उत्पादक उद्योगांची रणनीती उघड करताना).
२० मे रोजी उद्घाटन समारंभ व आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी शपथविधी कार्यक्रमाने मोहिमेला सुरुवात झाली.
यानंतर पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य लेखन, तसेच रुग्णांसाठी शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
२४ मे रोजी समाजजनजागृती कार्यक्रम राबवून महाविद्यालयाबाहेर जनतेशी थेट संपर्क साधण्यात आला.
तसेच वादविवाद, प्रश्नमंजुषा, प्रॉक्सी जाहिरात स्पर्धा, फेस पेंटिंग, आणि “तंबाखूविरोधी साइनबोर्डसोबत सेल्फी” अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाचे विभागप्रमुख डॉ. एल. राजपुरोहित, तसेच डॉ. रुचि अग्रवाल, डॉ. सुभाश्री मोहपात्र, डॉ. चैतन्य बुद्धिकोट आणि डॉ. मस्तुद संतोषकुमार यांनी या सर्व उपक्रमांचे सक्रियपणे आयोजन केले व उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
३१ मे रोजी सादर केलेल्या प्रभावी स्ट्रीट प्लेने या मोहिमेचा परमोच्च बिंदू साधला.
या संपूर्ण उपक्रमांमुळे डॉ. डी. वाय. पाटील डेंटल कॉलेजने जनजागृतीप्रधान आरोग्य शिक्षणाची दिशा ठरवत एक आदर्श सामाजिक भान ठेवणारे उदाहरण सादर केले आहे.
ही सर्व माहिती प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश शेट्टी यांनी दिली असून, त्यांनी समाजाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश दिला आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️