


पिंपरी, ता.३१: पिंपरी चिंचवड शहरातील ज्या काही सहकारी गृह रचना संस्थेमधील मैलाशुद्धीकरण केंद्र बांधकाम व्यावसायिकांच्या चुकीमुळे बंद आहेत अशा सोसायट्यांना आपल्या महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाने या सोसायट्यांचे एक जून 2025 पासून पाण्याचे नळ कनेक्शन कट करण्याच्या नोटिसा दिलेल्या आहेत.

,पाणी ही नागरिकांची अत्यावश्यक बाब आहे त्याचप्रमाणे नागरिकांना पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. तरी कृपया आपल्या प्रशासनाकडून ही जी नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम राबवली जाणार आहे .ती राबवू नये. महानगरपालिकेकडून ज्या सोसायटीमध्ये एसटीपी आहेत त्यांना ऑलरेडी 90 लिटर पर मानसी प्रमाणेच पाणी दिले जात असताना. परत सोसायटीचे नळ कनेक्शन कट करणे याला काही अर्थ नाही.
या ज्या सोसायट्यांचे मैलाशुद्धीकरण केंद्र बंद आहेत त्यांच्या अडचणी समजून घेऊन बांधकाम व्यवसायिकांनी निकृष्ट दर्जाचे बसवलेले मैलाशुद्धीकरण केंद्र यावर विकसकावर कारवाई करावी. चर्चा करून समन्वयाने यातून मार्ग काढावा परंतु कोणत्याही सोसायटीचे पाण्याचे नळ कनेक्शन कट करू नये ही विनंती.
अन्यथा आमच्या संस्थेमार्फत लोकशाही पद्धतीने या सर्व गोष्टींना विरोध करून आंदोलन केले जाईल. असे निवेदन पंकजाताई गोपीनाथ मुंडे, पर्यावरण मंत्री महाराष्ट्र शासन, आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, भोसरी विधानसभा, मा .मुख्य अभियंता पाणीपुरवठा विभाग पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी, शेखर सिंह, आयुक्त याना दिले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
