


पिंपरी, दि.२६: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जुनी सांगवी येथील पुतळ्याची साप्ताहिक पूजा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन बापू काटे तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस शितल भाऊ शिंदे यांच्या शुभहस्ते आज रविवार दिनांक 25 मे 2025 रोजी करण्यात आली.

यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती संपूर्ण शहराला व्हावी या हेतूने 30 कार्यक्रमांचे नियोजन शहर भारतीय जनता पार्टी तर्फे लावल्याचे जिल्हाध्यक्ष शत्रुघन बाप्पू काटे यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीची सगळी रचना कार्यरत झाल्याची देखील यावेळी त्यांनी निक्षून सांगितले.
अहिल्यादेवींचे कार्य केवळ धनगर समाजा पुरते मर्यादित नसून ते सर्व समावेशक आहे असे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सवाच्या अध्यक्षा विनाताई सोनवलकर माजी नगरसेवक राजू दुर्गे, सूर्यकांत गोफणे, अभिमन्यू गाडेकर, सचिन सरक, तेजस्विनी दुर्गे विठ्ठल देवकाते मनोज मारकड, नवनाथ बीडे, अंबादास पडळकर आदी सर्वजण उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
