Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास प्राधान्य
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ते अधिक सुरक्षित बनवण्यास प्राधान्य

suwarna gaware 26/05/2025
9115be7c-17ec-4967-9466-728ea264363f
Spread the love

‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे काम सुरू

पिंपरी, २६ मे २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने शहरातील प्रमुख रस्ते अधिक सुरक्षित व सर्वसमावेशक बनवण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प हाती घेतला आहे. या अंतर्गत दापोडी, निगडी प्राधिकरणसह शहरातील विविध भागातील रस्ते नागरिकांसाठी सुरक्षित, वाहतुकीच्या सुरळीत संचलनासाठी बनवण्यात येत आहेत. या रस्त्यांवर सलगपणे चालताना पादचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याला प्राधान्य दिले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना नागरिकांना/पादचाऱ्यांना सलगपणे समपातळीत सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीशी सुसंगत हे रस्ते असतील, याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर देखील पादचारी नागरिकांसाठी विनाअडथळा फुटपाथ, स्वतंत्र सायकल ट्रॅक, बसण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासोबत सुरक्षितपणे नागरिकांना रस्ता ओलांडता येईल, यादृष्टिनेही उपाययोजना करण्यात येत आहेत.

हा प्रकल्प राबवताना पथदिवे, चौकांची नव्याने रचना, सेवा वाहिन्या याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. ही सर्व कामे ‘इंडियन रोड्स काँग्रेस’ (आयआरसी) च्या मानकांनुसार केली जात आहेत.

पॅरिस, कोपनहेगन आणि अ‍ॅमस्टरडॅम अशा शहरांनी पादचारी आणि सायकलस्वार यांच्यासाठी रस्त्यावर प्रवास सुरक्षित असावा, यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. या शहरांप्रमाणेच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते बनवण्यास प्राधान्य देत आहे.
…….

पादचारी व सायकलस्वारांचे करण्यात आले सर्वेक्षण

‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ या प्रकल्पाचा आराखडा तयार करताना नागरिक, निवासी संस्था, विक्रेते, दुकानदार, वाहतूक पोलीस आदी सर्व घटकांशी सविस्तर सल्लामसलत करण्यात आली. नागरिकांचे अभिप्राय घेऊन ते रस्त्याच्या नियोजन व रचना प्रक्रियेत समाविष्ट करण्यात आलेले आहेत.

आयटीडीपी इंडिया संस्थेने पादचारी आणि सायकलस्वारांचे सर्वेक्षण केले. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर केलेल्या सर्वेक्षणात ७९ टक्के नागरिकांनी सांगितले की, रस्त्यांची रचना सुधारली गेल्यास सायकल चालवणे व फुटपाथवरून पायी चालण्याचे प्रमाण वाढेल. ८७ टक्के नागरिकांनी रस्त्याची सुरक्षित रचना आणि जागेचे पुनर्वितरण करण्यास पाठिंबा दिला. ८७ टक्के नागरिकांना रस्ता ओलांडताना असुरक्षित वाटत असल्याचे मत व्यक्त केले. ८२ टक्के नागरिकांनी सध्याचा रस्ता मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांना असुरक्षित असल्याचे सांगितले. ७६ टक्के नागरिकांना रात्री प्रवास करताना समस्या जाणवत होत्या तर ५९ टक्के नागरिकांनी अति वेगाने जाणारी वाहने ही मोठी समस्या असल्याचे मत मांडले.

या सर्वेक्षणाबाबत आयटीडीपी इंडियाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रांजल कुलकर्णी यांनी सांगितले की, पादचारी व सायकलस्वार यांच्यासाठी प्रामुख्याने हा सर्व्हे होता. तर, ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्पांतर्गत रस्त्यांचे फक्त सौंदर्यीकरण करण्यावर भर दिला जात नाही, तर हा प्रकल्प पादचारी व सायकलस्वारांसाठी सुरक्षित रस्ते देण्याच्या दृष्टिने व्यापक प्रक्रिया आहे, असे आर्किटेक्ट-अर्बन डिझायनर प्रसन्ना देसाई यांनी सांगितले.
……..

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारे रस्ते केवळ वाहनांसाठी नाही तर पादचारी, सायकलस्वार यासह सर्वांसाठी सुरक्षित असतील, याकडे प्राधान्याने लक्ष देत आहोत. शहरातील रस्ते सुरक्षित करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. रस्त्यांची कामे करताना सार्वजनिक-खासगी वाहनांसोबतच पादचारी, सायकलस्वार नागरिक यांचाही विचार केला जात आहे.

  • शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……..

पिंपरी चिंचवड शहरातील काही भागातील रस्ते अरुंद झाल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर वाहनचालकांप्रमाणेच पादचारी, सायकलस्वार यांनाही रस्त्यांवरील प्रवास सुरक्षित करून देणे यास प्राधान्य देऊन आम्ही रस्त्याच्या लगत असलेली व वापरात नसलेल्या जागेचे पुनर्वितरण करून आणि पार्किंग व वाहन मार्गांची योग्य रचना करून रस्ते अधिक सुरक्षित व वाहतूक सुरळित होण्यासाठी उपयुक्त ठरतील, असे बनवण्यास प्राधान्य देत आहोत.

  • बापूसाहेब गायकवाड, सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    ……..
    कोट

शहरात दर १०० लोकांमागे ९० खासगी वाहने आहेत. त्यामुळे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे की, रस्ते रुंद करणे ही शाश्वत उपाययोजना नाही. असा उपाय करणे तात्पुरता मार्ग आहे. या समस्येवर दीर्घकालीन उपाय करण्याच्या दृष्टिने ‘अर्बन स्ट्रीटस्केप्स’ प्रकल्प प्राधान्याने राबवला जात आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतुकीसोबतच, पादचारी, सायकलस्वार यांचाही विचार करण्यात आला आहे.

  • सुनिल पवार, कार्यकारी अभियंता, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
    …….
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 47
Tags: #cycle #road Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीमे मध्ये पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये तृतीय
Next: पहिली राष्ट्रीय थाई किक बॉक्सिंग चॅम्पियनशिप यशस्वीरीत्या पार पडली महाराष्ट्र संघ विजेता

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.