Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर उपजीविका कृती आराखडा उपक्रमासाठी दोन दिवसीय विशेष गट चर्चा संपन्न
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहर उपजीविका कृती आराखडा उपक्रमासाठी दोन दिवसीय विशेष गट चर्चा संपन्न

suwarna gaware 23/05/2025
4935e575-ef5b-4779-85e5-0a8b8240abdb
Spread the love

१८० हून अधिक भागधारक तसेच विविध क्षेत्रातील प्रतिधिनींनी भविष्यातील उपजीविकेतील आव्हाने व संधींवर दिला भर

पिंपरी, दि. २३ मे २०२५: शहरातील उपजीविकेच्या संधी अधिक बळकट व्हाव्यात या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिकेने २१ व २२ मे २०२५ रोजी ‘शहर उपजीविका कृती आराखडा’ (City livelihood action plan – CLAP) अंतर्गत दोन दिवसीय विशेष गटचर्चेचे आयोजन केले होते. या दोन दिवसीय सत्रामध्ये उद्योग, शासकीय विभाग, पतसंस्था, सामाजिक संघटना आणि नागरी समाजातील एकूण १८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला.

२१ मे रोजीचे सकाळचे सत्र विविध कंपन्यांचे एचआर लीडर्स आणि लाइट हाऊस, टाटा स्ट्राईव्ह यांसारख्या प्रशिक्षण संस्थांच्या सहभागाने पार पडले. नव्या पिढीची बदलती मानसिकता, कामाच्या अपेक्षा आणि रोजगारातील अडचणी यावर सखोल चर्चा यावेळी झाली. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा, सॉफ्ट स्किल्स आणि नोकरीसाठी तयार होण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण यावर देखील यावेळी भर देण्यात आला.

दुपारच्या सत्रात उद्योग-व्यवसाय, पायाभूत सुविधा व बांधकाम आणि वित्त या तीन प्रमुख क्षेत्रांवर चर्चा झाली. यामध्ये शासकीय विभाग (उदा. दुकाने आणि आस्थापना नोंदणी, कृषी व अन्न प्रक्रिया), महापालिका अधिकारी तसेच एमसीसीआयए, छावा मराठा सेना, कष्टकरी संघर्ष महासंघ, सीआयआय, आरंभ फेडरेशन, कोस्मॉस बँक, युनियन बँक, कॅनरा बँक, इक्विटास बँक, टाटा स्ट्राईव्ह आणि स्थानिक फेरीवाले संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कर्जपुरवठा, सुलभ कागदपत्र प्रक्रिया, व्यवसायासाठी जागेची उपलब्धता, स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि बाजार जोडणी यासंबंधी यावेळी मुद्दे मांडण्यात आले.

२२ मे रोजी सकाळच्या सत्रात वाहतूक, आरोग्य, पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. पीएमपीएमएल, आरटीओ, पर्यावरण व उद्यान विभाग, तसेच रिक्षा संघटना, हॉटेल वृंदावन, डबल ट्री, हॉटेल कलासागर, सायन्स पार्क, मोरया गोसावी ट्रस्ट, वात्सल्य रुग्णालय, तालेरा रुग्णालय, बीव्हिजी ग्रुप आणि सीआयआय यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. योजनांची अपुरी माहिती, आर्थिक सहाय्याचा अभाव आणि कौशल्य प्रशिक्षणातील गरजा या प्रमुख आव्हानांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

दुपारच्या सत्रात ज्येष्ठ नागरिक, स्वयं सहायता गट, महिला उद्योजक, ट्रान्सजेंडर समुदाय आणि दिव्यांग व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून चर्चा झाली. यामध्ये एकूण ५४ प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सामाजिक भेदभाव, समावेशक पायाभूत सुविधांचा अभाव, मर्यादित उपजीविका संधी आणि विशेष प्रशिक्षण व आर्थिक समावेशाची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला.

शासकीय योजनांची माहिती आणि प्रवेश अजूनही अनेक घटकांपर्यंत पोहोचलेली नाही ही गोष्ट या सर्व सत्रांमधून प्रकर्षाने समोर आली. तसेच महिला उद्योजकांनी बाजारपेठेत प्रवेश व पतपुरवठा यावर भर दिला, तर युवक व उद्योग क्षेत्राने उद्योगासाठी सक्षम मनुष्यबळातील कमतरता यावेळी अधोरेखित केली. ट्रान्सजेंडर व दिव्यांग घटकांनी सन्मान, ओळख आणि त्यांच्या गरजेनुसार योजना राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली.

‘शहर उपजीविका कृती आराखडा’ हा उपक्रम राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत तयार केला जात असून, शहरातील उपजीविकेच्या संधी अधिक व्यापक व समावेशक करण्याचा त्याचा उद्देश आहे.

या दोन दिवसीय विशेष गटचर्चेच्या माध्यमातून मिळालेल्या महत्वपूर्ण सूचनांच्या आधारे आराखड्याचे प्रारूप तयार केले जाणार असून, लवकरच ते नागरिकांच्या अभिप्रायासाठी सादर करण्यात येणार आहे.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 47
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: शिवसेनेच्या आंदोलनात पिंपरी चिंचवडच्या लेकींची मृत वैष्णवीला अनोखी श्रद्धांजली!
Next: महावितरणची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा!

Related Stories

4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026
3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

suwarna gaware 02/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.