Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • इंद्रायणी- पवना संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध!
  • Daily Breaking News
  • Maharashtra

इंद्रायणी- पवना संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध!

suwarna gaware 21/05/2025
1dcc4ca2-4196-4061-854a-1b31239cd2c5
Spread the love
  • राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांचे आश्वासन
  • आमदार महेश लांडगे यांची मंत्रालयात बैठक

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी, दि. २१: पवना आणि इंद्रायणी नदी या पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिन्या आहेत. नदी हे स्वच्छ आणि आरोग्यदायी शहराचे प्रतीक असते. त्यामुळे इंद्रायणी, पवना संवर्धनासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले आहेत.

नदी सुधार प्रकल्पाला निधी, पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी नदी सुधार प्रकल्पामध्ये सुचवलेले बदल समाविष्ट करून नवीन डीपीआर करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नदी संवर्धनासाठी एकत्रित आराखडा राबवणे यांसारख्या सूचना आणि नदी सुधार प्रकल्प राज्य सरकारच्या तांत्रिक समितीची प्रशासकीय मान्यता तात्काळ द्यावी, असे निर्देशही नगरविकास विभागाला दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या जीवनवाहिनी नदी पवना व इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पाच्या संदर्भामध्ये विविध मुद्द्यांवर राज्याच्या नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई, मंत्रालय येथे बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली.

या बैठकीमध्ये भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पवना आणि इंद्रायणी नदी संवर्धनाबाबत विविध मुद्द्यांवर लक्ष वेधले.

यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पर्यावरण विभाग, नगरविकास विभाग आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये आमदार महेश लांडगे यांनी इंद्रायणी व पवना नदी प्रदूषणाकडे लक्ष वेधतानाच या नद्यांसाठी पुनरुज्जीवन प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. नदीप्रदूषण आणि महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पातील त्रुटी याबाबत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरणप्रेमी आणि स्वयंसेवी संस्था-संघटनांनी गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू केले आहे. पर्यावरणप्रेमींनी सुचविलेले मुद्दे रास्त असून, त्याचा अंतर्भाव नदीसुधार प्रकल्पामध्ये करावा, अशी मागणी लांडगे यांनी केली.


बैठकीतील प्रमुख मुद्दे…
या बैठकीमध्ये नदी सुधार प्रकल्पाला तांत्रिक मान्यता देणे. केंद्र सरकारच्या एनआरसीडी योजनेअंतर्गत निधी देणे, पर्यावरण प्रेमी व स्वयंसेवी संस्थांनी नदी सुधार प्रकल्पामध्ये सुचवलेले बदल समाविष्ट करून नवीन डीपीआर तयार करणे. पिंपरी महापालिका आणि पीएमआरडीए हद्दीतील नदी प्रदूषणावरती उपाय योजना करणे. या प्रमुख मुद्द्यांबाबत नगर विकास विभागाशी संबंधित प्रलंबित प्रस्ताव तात्काळ मार्गी लावावेत.

इंद्रायणी नदीवरील निघोजे तळवडे बंधाऱ्यात ग्रामीण भागातून मिसळणाऱ्या सांडपाण्याबाबत उपाययोजना करावी. मौजे चिखली येथील दफनभूमी आरक्षणामधील 40 टक्के क्षेत्र मैलाशुद्धीकरण केंद्र (STP) वापरासाठी बदल करण्यात यावा. इंद्रायणी व पावना नदी सुधार प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कार्य समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया :
पवना व इंद्रायणी नदी संवर्धनासाठी प्रशासकीय पातळीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची योग्यरीत्या कार्यवाही व्हावी. राज्य शासनाकडून नदी संवर्धनासाठी तात्काळ निधी प्राप्त व्हावा. तसेच राज्य शासनाकडील परवानग्यांमुळे प्रलंबित कामांची कार्यवाही व्हावी आणि नदी संवर्धन योग्य वेळेत व्हावे यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामध्ये पर्यावरण प्रेमींनी सूचवलेले मुद्दे समाविष्ट करावे आणि सुधारित ‘डीपीआर’ बनवण्याची मागणी केली असून, त्याला मंत्री महोदय यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नदी संवर्धन, नदीचे पुनरुज्जीवन आणि शहराचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी आम्ही नेहमीच प्राथमिकता दिलेली आहे.

  • महेश लांडगे, भाजपा, पिंपरी- चिंचवड, पुणे.
suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 83
Tags: #indryani river #आमदार महेश लांडगे Pcmc Pimpri and Chinchwad politics भोसरी

Continue Reading

Previous: आला पावसाळा… डेग्यूपासून स्वत:ला सांभाळा
Next: माजी पंतप्रधान, भारतरत्न दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन तसेच दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.