


आरोग्य विभागाच्या बुडाखाली अंधार

निगडी, ता. १९ : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मोठ-मोठे जाहिरात बाजी सुरू असताना प्रत्यक्षात निगडे मधील महापालिकेच्या अ प्रभागाच्या अंतर्गत संत तुकाराम व्यापार संकुलन परिसरामध्ये कचऱ्याचे ढीग व ड्रेनेजचे मैला पाणी पसरले असून ही परिस्थिती गंभीर आणि विरोधाभासी ठरत आहे. त्याने रोगरावी फैलवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वच्छतेसाठी इंदूर पॅटर्न राबवणारा व नागरिकांना दंड करणारा आरोग्य विभाग महापालिकेच्या इमारतीच्या आवारात कचरा असल्यावर कोणाला दंड करेल असावा तर नागरिक विचारत आहेत.

आकुर्डी येथील अ प्रभाग अंतर्गत महापालिकेने 1998 साली निर्माण केलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापार संकुलन निर्माण केले त्या ठिकाणी अनेक व्यावसायिक गाळे निर्माण करून गरजूंना हस्तांतरित करण्यात आले. बचत गटाच्या नावावर गाळे घेऊन गैरव्यवहार करण्यात आले. सदर इमारतीत पसरलेल्या दुर्गंधीमुळे येथे येणाऱ्या ग्राहकांचे ज्येष्ठ नागरिकांची विशेषतः अडचण होत आहे.

विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे पावसाळा तोंडावर असताना साठलेला कचरा पाणी हे डेंगी प्रताप सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देत आहे. महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी व संबंधित अधिकाऱ्यांची या संपूर्ण प्रकरणाकडे असलेली उदासीनता प्रदर्शनाने जाणवत असून आरोग्याच्या प्राथमिक गरजा कडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येते.
सदर ठिकाणी शैक्षणिक अकॅडमी, शासकीय कार्यालय, हॉटेल व्यवसायिक तसेच अनेक प्रकारचे कार्यालय आहेत. आषाढ महिन्यात याच ठिकाणी वारकऱ्यांचे राहण्याची व्यवस्था केली जाते, या ठिकाणी पहाटेच्या वेळी वृत्तपत्र वितरण व्यवस्था असून आपल्या घरोघरी वृत्तपत्र पोहोचविणारे वृत्तपत्र विक्रेत्यांना या घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत साच लेल्या कचऱ्यावर पावसाचे पाणी पडतो व दुर्गंध सुटते, रोगराईला आमंत्रण मिळते, साथीचे रोग पसरतात. त्यामुळे महापालिका प्रशासनाने योग्य ती खबर घेऊन उपाययोजना करावे.
आकुर्डी परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी झटणाऱ्या महापालिकेच्या निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज व्यापार संकुलनमध्ये गेल्या अनेक महिन्यापासून कचऱ्याचे ढीग साठत आहेत. महापालिका प्रशासनासाठी ही अशोभनीय बाब ठरले आहे. उघड्यावर कचरा टाकून घाण करत रोगराईचा निमंत्रण देणाऱ्या कचरा टाकणाऱ्यावर खडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असलेल्या परिसरात कचरा संकलित करण्यासाठी यंत्रणा प्रभाग कार्यालयामार्फत राबवली जाते.
घरोघरी जाऊन कचरा गोळा केला जातो, तरी देखील काही महाभाग या ठिकाणी मुद्दामून कचऱ्याचे गाठोडे नेऊन टाकतात. त्यामध्ये त्या इमारतीतील व्यावसायिकांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. त्यांच्या या खोडसाळपणाचा सर्वांना मनस्ताप होत आहे. अंधाराचा गैरफायदा घेत कामावरून जाता येता काहीजण व्यापारी संकुलनच्या भिंती लगत / नाल्याच्या बाजूला कचरा टाकून जातात.
मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून हा कचरा वेळेत उचलला न गेल्यामुळे दुर्गंधी सुटते. भटक्या स्वानांचा धोकादायक वावरही वाढला आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी महापालिकेचे काही दिवस तेथे कर्मचारी नेमावा जेणेकरून खोडसाळ वृत्तीच्या लोकांना कचरा टाकता येणार नाही आणि टाकल्यास दंडात्मक कारवाई करता येईल. असे मोहीम उघडल्यास तेथील या समस्येवर नियंत्रण ठेवता येईल अशी मागणी नागरिक करीत आहेत.
अनधिकृत बांधकाम व ताबा
सदर इमारतीमध्ये अनेक व्यवसायिकांनी आपापल्या सोयीनुसार जागा मिळेल देते तारेचा कंपाउंड मारून जागा आपल्या मालकीची केले आहेत. काही दुकानदार दुकानासमोरील पार्किंगच्या जागेत सुशोभीकरणाच्या नावाखाली पक्की बांधकाम करून वाहन तळाला अडचण निर्माण केले आहे.
सदर इमारतीमधील अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या व ताबा मारणाऱ्या व्यापाऱ्यावरती कारवाई करावी. अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.
शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️