Skip to content
10/09/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे
  • Daily Breaking News
  • Poilitical

आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा समतोल राखून संघटन मजबूत करणार : भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे

suwarna gaware 16/05/2025
957a80ac-40a6-45f4-b629-aaff3a830dec
Spread the love

शत्रुघ्न (बापू) काटे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदाचा पदभार

पक्षात कोणाचीही नाराजी नाही; 20 दिवसांत नवीन कार्यकारिणी जाहीर करणार

पिंपरी-चिंचवड, ता.१६ : भारतीय जनता पार्टीच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर शत्रुघ्न (बापू) काटे यांनी आज अधिकृतपणे शहराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या समारंभात, पिंपरी चिंचवड जिल्हा निवडणूक निरीक्षक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते मावळते शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले.

मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक उंची गाठेल. त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य खूप चांगले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल,” असे आमदार शंकर जगताप म्हणाले.

कार्यक्रमात बोलताना शत्रुघ्न काटे यांनी पक्षाने सोपवलेल्या जबाबदारीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात तसेच मावळते शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना अधिक मजबूत करण्यावर भर राहील. शहरातील 4500 सक्रिय सदस्य आणि 3 लाख प्राथमिक सदस्यांच्या सहकार्याने संघटन वाढविण्याचे काम करणार असून, जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेची कामे मार्गी लावण्यास प्राधान्य राहील. गेल्या तीन वर्षांपासून जनतेची कामे निरंतर सुरू असून, आगामी महापालिका निवडणुका ताकदीने लढवल्या जातील. पक्षात कोणाचीही नाराजी नसून, शहरातील आमदार आणि माजी पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना काम करेल. पक्षात दूजाभाव होणार नाही, याची दक्षता घेऊन पुढील 20 दिवसांच्या कालावधीत कार्यकारिणी गठित केली जाईल,” असे नवनियुक्त शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे म्हणाले.

यावेळी, आमदार महेश लांडगे म्हणाले, “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी अधिक मजबूत होईल.”

आमदार उमाताई खापरे म्हणाल्या की, “शत्रुघ्न काटे यांच्या अनुभवाचा संघटनेला निश्चितच फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अमित गोरखे म्हणाले ; “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक गतिमान होईल.”
माजी आमदार अश्विनी जगताप शुभेच्छा देत म्हणाल्या; “शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर विकासाच्या दिशेने वाटचाल करेल.”

याप्रसंगी आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, माऊली थोरात, महेश कुलकर्णी, चंद्रकांत नखाते, संतोष कलाटे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, राहुल जाधव, मनोज तोरडमल, सरचिटणीस संजय मंगोडेकर, विलास मडेगिरी, शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पालांडे, प्रदेश सचिव तेजस्विनी कदम, युवा मोर्चा अध्यक्ष राज तापकीर, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, काळूराम बारणे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, नितीन लांडगे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, राजेंद्र गावडे, हर्षल ढोरे, विकास डोळस, सागर गवळी, हर्षल ढोरे, संदीप कस्पटे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, शारदा सोनवणे, उपाध्यक्ष कैलास सानप, बिभीषण चौधरी, प्रदेश सदस्य कविता हिंगे, जयनाथ काटे, मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, गणेश ढोरे, सनी बारणे, ॲड. हर्षल नढे, मोहन राऊत, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, गणेश वाळुंजकर, ॲड. योगेश सोनवणे, रामदास कुटे, योगेश सोनवणे, अमोल डोळस, शिवराज लांडगे, संकेत चोंधे, राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, योगेश चिंचवडे, दीपक भोंडवे, विजय फुगे, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाडये, पल्लवी मारकड, डॉ. तृप्ती परदेशी, नामदेव पवार, मधुकर बच्चे, गणेश आर. ढाकणे, देविदास पाटील, देवदत्त लांडे, जवाहर ढोरे, हिरेन सोनवणे, दत्ता यादव, चैतन्य देशपांडे, अभिजित बोरसे, देविदास साबळे, कुणाल लांडगे, गणेश वाळुंजकर, आदेश नवले, खंडूदेव कथोरे, दत्ता ढगे, प्रीती कामतीकर, सुप्रिया चांदगुळे, राजश्री जायभाय, गीता महेंदू, आशा काळे, सीमा चव्हाण, रोहिणी रासकर, पुष्पा सुबंध, अंतरा देशपांडे, दिपाली कलापुरे, शोभा भराडे, पोपट हजारे, प्रदीप बेंद्रे, भूषण राऊत, आनंद देशमुख, सचिन राऊत, संजय पटनी, विजय शिनकर, बबन डांगले, अर्जुन ठाकरे, दत्ता गव्हाणे, मनोज ब्राह्मणकर, कीर्ती परदेशी, कोमल शिंदे, प्रतिभा जवळकर, मनिषा शिंदे, सागर फुगे, डॉ. प्रताप सोमवंशी, सीमा बोरसे यांच्यासह शहरातील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 48
Tags: #shatrugn kate Pcmc Pimpri and Chinchwad politics

Continue Reading

Previous: टाटा मोटर्स व लाईटहाऊसच्या संयुक्त उपक्रमामुळे २४ युवकांना उपलब्ध झाल्या रोजगाराच्या संधी
Next: डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन उत्साहात साजरा

Related Stories

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर 7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d 1

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

10/09/2026
फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38 2

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

08/09/2026
निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक 4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724 3

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

03/09/2026
लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा 2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef 4

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

02/09/2026
क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी 3f8116cd-99ba-4589-80b4-49a26e8e58ec 5

क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

02/09/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

7c68665c-9d4c-4a5d-86e4-a832ba8a9e7d
  • Daily Breaking News

लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

suwarna gaware 10/09/2026
bb46dc37-2835-47d7-9736-5c1485317e38
  • Daily Breaking News
  • Maharashtra

फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश

suwarna gaware 08/09/2026
4cb59c05-768c-44b9-96ec-cde55cda7724
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक

suwarna gaware 03/09/2026
2ab21609-c117-42b9-9dad-ab31ab6e3cef
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा

suwarna gaware 02/09/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • लाडक्या बहिणीं’साठी सकारात्मक निर्णय घेऊ : राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर
  • फेरीवाल्यांकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत; चार महिन्यांत योजना अधिसूचित करण्याचे निर्देश
  • निगडी कामगार मृत्यू प्रकरणी बीएसएनएल व पोलिस अधिकारी यांच्यासमवेत बैठक
  • लाडक्या बहिणींचा मुंबईत आक्रोश मोर्चा
  • क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसी संघाला उपविजेतेपद; चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.