


लक्ष्मी जन्माला आली हा संदेश देत जनजागृती

पिंपरी, ता. १५: सौ स्वाती व श्री सोपान शंकरराव तापकीर यांची नात व शिवांजली सुमितराजे यांची मुलगी तसेच श्वेता गणेश पानमंद यांच्या ‘शिवन्या’या दोन महिन्याच्या भाचीचे चऱ्होली मध्ये मोठ्या वाजत गाजत थाटामाटात स्वागत करण्यात आले. लक्ष्मी जन्माला आली हा संदेश देत जनजागृती केली.
चऱ्होली मधील आळंदी विश्राम गृहाशेजारी, कॉलनी नं.५ येथे कुटुंबीय राहतात. माहेरहून सासरी आणताना दोन महिन्याची झाल्यानंतर बँड पथक वाद्यांच्या गजरात स्वागत केले गेले. पुरोहित महाजन काका यांच्या हस्ते मंत्र पुष्पांजली झाली.
व संतकृपा ट्रॅव्हल प्रोप्रायटरचे सौ जयश्री दशरथशेठ पानमंद सौ श्री माधुरी तुकाराम लांडगे यावेळी उपस्थित होते. सर्व अप्तेष्ट नातेवाईकांच्या उपस्थितीत मोठ्या आनंदात व थाटामाटात हा लक्ष्मीचे स्वागत सोहळा संपन्न झाला. नातीचे, मुलीचे, भाचीचे स्वागत समारंभ सर्वांनी गोड धोड वाटून साजरे केले. त्या नंतर सर्व पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
