


पुणे, दि. १४ : इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, पुणे येथे १२ व १३ एप्रिल २०२५ रोजी पार पडलेल्या “NextGen Technology and AI for a Sustainable Future (NTAI 2025)” या आंतरराष्ट्रीय परिषदेतील उत्कृष्ट संशोधन लेखासाठी प्रा. प्रविण देविदास चरडे यांना ‘बेस्ट पेपर अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला.

त्यांनी सादर केलेल्या “Review of New Hybrid Material for 2-Wheeler Dashboard” या संशोधन प्रबंधामध्ये दुचाकी वाहनांच्या डॅशबोर्डसाठी नवीन हायब्रिड साहित्याच्या पुनरावलोकनावर भर देण्यात आला होता. या लेखाचे उद्दिष्ट हे कमी वजनाचे, टिकाऊ व पर्यावरणपूरक साहित्य संशोधन करून ऑटोमोबाईल उद्योगाला एक शाश्वत पर्याय प्रदान करणे होते,ही अभ्यासपूर्ण शोधनिबंध सादरीकरणाची प्रक्रिया डॉ. लक्ष्मण कांबळे, डॉ. प्रणय मकासरे आणि प्रा. राहुल कुलकर्णी, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाली. त्यासाठी त्यांना इंदिरा कॉलेजमधील त्यांचे सहकारी प्रा. डॉ.विकास नांदगावकर व प्रा. अतुल गोरे यांनी सहकार्य केले.
या परिषदेचे आयोजन इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड मॅनेजमेंट, पुणे यांनी केले होते आणि ही परिषद जागतिक तंत्रज्ञानतज्ज्ञ, संशोधक आणि अकादमिक क्षेत्रातील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत पार पडली.
प्रा. चरडे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
