Skip to content
27/07/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी 82 कोटींची निविदा
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलोमीटर रस्त्यासाठी 82 कोटींची निविदा

suwarna gaware 11/04/2025
IMG_0810
Spread the love

पिंपरी, ता. ११: भोसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चौकापर्यंत केवळ सव्वा किलाेमीटर रस्त्यासाठी 82 कोटींच्या निविदेच्या कामाला तातडीने स्थगिती देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी भ्रष्ट अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील टेल्काे रस्त्यावरील भाेसरीतील गवळी माथा ते इंद्रायणी चाैकापर्यंतचा सव्वा किलोमीटरचा रस्ता महापालिका अद्यावत पध्दतीने विकसित करणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूने मार्गिका, वाहनतळ, सायकल ट्रॅक, हरितपट्टा, सेवा वाहिन्या, पदपथ, व्यायामशाळा, शाैचालय उभारणार आहे. या कामासाठी तब्बल 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रूपये खर्च करण्यात येणार आहे. हे काम धनेश्वर क्रन्स्ट्रक्शनला देण्यास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कामासाठी महापालिका कर्ज काढणार आहे. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय राजवटीत रिन काढून सण साजरे करण्याचे प्रकार सुरू आहे.


पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही अधिकारी, सल्लागार संगणमत करून विशिष्ट अटी शर्ती कोट्यावधीचा मलिदा लाटून राजकीय वरदहस्त असणाऱ-या ठेकेदारांनाच कामे देतात. हे भ्रष्ट अधिकारी संबंधित ठेकेदाराला संपूर्ण निविदा प्रक्रियेची अगोदरच माहिती देतात, दर निश्चिती करतात, रिंग घडून आणतात, निविदा भरताना काही ठेकेदारांना दमदाटी करतात, स्पर्धा झाल्याचा आभास निर्माण करतात,कामाला मुदतवाढ देतात,बिनबोभाट वाढीव खर्च मंजूर करतात.

अशा प्रकारे महापालिकेच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालतात. विकास कामांच्या नावाखाली महापालिकेत कोट्यवधी रूपयांचा प्रशासनाच्या वतीने चुराडा सुरू आहे. महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी आणि पिंपरी ते दापोडी या मार्गावर अर्बन स्ट्रीट डिजाईननुसार पदपथ व सायकल ट्रॅक तयार करून सुशोभीकरण केले जात आहे. अशाप्रकारे शहरात रुंद रस्ते अरुंद करून वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण करत आहेत.या अर्बन स्टेटच्या या रस्त्यासाठी सुमारे दीडशे कोटी रूपयांचा खर्च केला जात आहे.

एकीकडे महापालिकेचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाचे नियोजन करणे गरजेचे असताना प्रशासन अर्बन स्ट्रीटसारखा संकल्पना राबवत आहे. यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक होणार आहे.


शहरातील टेल्को रस्ता हा मुख्य रस्त्यांपैकी एक महत्वाचा रस्ता आहे. केसबी चौकापासून इंद्रायणीनगरपर्यंत हा रस्ता साडेआठ किलो मीटर अंतराचा आहे. त्यापैकी गवळी माथा ते इंद्रायणी नगर या सव्वा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचा अद्यावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मॅप्स ग्लोबल सिव्हिलटेक प्रा. लि. यांची नियुक्ती केली.

रस्त्याचे आवश्यक सर्वेक्षण आणि नकाशे तयार केले. या सर्वेक्षणात सध्यःस्थितीतील सहा पदरी रस्ता अपुरा पडत आहे. त्यासाठी हा सव्वा किलोमीटर अंतराचा रस्ता विकसित करण्याचे नियोजन केले. त्यानुसार 90 कोटी 65 लाख 77 हजार 455 रूपयांची निविदा प्रसिध्द केली. यामध्ये केवळ दोन ठेकेदारांनी सहभाग घेतला. दोन वेळा निविदेला मुदतवाढ दिल्यानंतरही मे. धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन आणि अजवाणी इन्फ्रास्ट्रक्चर या दोनच ठेकेदारांनी या कामासाठी निविदा भरली. त्यानंतर महापालिकेने 11 टक्के कमी दराची धनेश्वर क्रन्स्ट्रक्शन प्रा. लि. या ठेकेदाराची निविदा स्विकारली. त्यांच्याकडून 81 कोटी 77 लाख 55 हजार 556 रूपयांमध्ये काम करून घेण्यास आपण आयुक्त तथा प्रशासक म्हणून मान्यता दिली आहे.


मे. धनेश्वर कंट्रक्शन प्रा.लि. हा ठेकेदार राजकीय हितसंबंधातील असून महानगरपालिकेचे बहुतांशी मोठ्या रकमेचे कामे तो पालिकेचा जावई असल्याप्रमाणे त्यालाच कामे मिळतात. या ठेकेदाराला हे काम देताना महापालिका प्रशासनातील अधिकारी या संगणमातात सामील असतात. ते संबंधित ठेकेदारांना आगाऊ माहिती पुरवतात, त्यातून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतात. इतर ठेकेदारांना स्पर्धेत भाग घेऊ देत नाही, दमदाटी, दादागिरी करतात, संगतमत करून रिंग करतात. हे आपल्याला सर्व आपल्याला माहीत असताना देखील आयुक्त शेखर सिंह या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरातील करदात्या नागरिकांचे आर्थिक नुकसान होते.


तरी आपण या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन मे. धनेश्वर कंट्रक्शन प्रा.लि. देण्यात आलेले या कामाचा तातडी स्थगिती देण्यात यावी. या निविदा प्रक्रिया मध्ये सामील असणारे अधिकार्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 145
Tags: #maruti bhapkar Pcmc Pimpri and Chinchwad भोसरी

Continue Reading

Previous: आरटीओ प्रशासन झोपले होते काय ? काशिनाथ नखाते
Next: पिंपरी-चिंचवडमध्ये हनुमान जयंतीनिमित्त ११११ भक्तांचे सामूहिक पठण आणि पारंपरिक जोर-बैठक स्पर्धा

Related Stories

da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f 1

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

22/07/2026
आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6 2

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

15/07/2026
पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा 249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700 3

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

14/07/2026
स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश 02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901 4

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

06/07/2026
पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते 41222d03-183d-4ce3-91a7-7a58c6a30370 5

पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

04/07/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

a07d775e-b732-4531-9c37-2a08f0a4616f
  • Cultural

दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन

suwarna gaware 22/07/2026
da6a6f1f-8535-42da-b15b-d3483e7b4ba6
  • Daily Breaking News
  • Maharashtra

आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते

suwarna gaware 15/07/2026
249b6d4f-90f1-4aeb-99b9-55d317b30700
  • Daily Breaking News
  • Cultural

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

suwarna gaware 14/07/2026
02ba564a-b0df-4183-a16e-1c8761f3a901
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates
  • Education

स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश

suwarna gaware 06/07/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • दिवंगत अजितदादा पवार यांना कामगारांकडून अभिवादन
  • आंदोलकाशी न बोलणे हे सरकारच्या अक्षम्य चूका – काशिनाथ नखाते
  • पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेचा ५४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
  • स्कॉलरशिप परीक्षेत चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयातील तब्बल 14 विद्यार्थ्यांना घवघवीत यश
  • पिंक ई-रिक्षा योजना सरकारचे नाटक होते का ? – काशिनाथ नखाते

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • Dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.