Skip to content
02/06/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • उद्योग सुविधा कक्षाविषयी महापालिका व उद्योजकांमध्ये समन्वय बैठक संपन्न
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

उद्योग सुविधा कक्षाविषयी महापालिका व उद्योजकांमध्ये समन्वय बैठक संपन्न

suwarna gaware 08/04/2025
b4f1d278-e51b-42c5-a4e8-3c39319b2966
Spread the love

व्यवसाय सुलभतेसाठी ‘उद्योग सारथी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्योजकांकडून स्वागत

पिंपरी, दि. ७ एप्रिल २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘उद्योग सुविधा कक्ष’ कार्यान्वित केला आहे. या कक्षाअंतर्गत उद्योजक आणि महापालिका यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करून औद्योगिक अडचणींचे निराकरण, संवाद आणि सुविधा सुलभ करण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली.

महापालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेल्या उद्योग सुविधा कक्षाबद्दल माहिती देण्यासाठी उद्योजकांसमवेत एका विशेष बैठकीचे आयोजन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले, यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी तसेच उद्योग व सुविधा कक्ष व CSR प्रमुख निळकंठ पोमण, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, अजिंक्य येळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी दीपक पवार, उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे आणि सीएसआर सल्लागार श्रुतिका मुंगी आणि शहरातील उद्योजक उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी यावेळी उद्योग-सारथी पोर्टलचे सादरीकरण केले. ते म्हणाले, राज्य शासनाच्या ‘१०० दिवसांचा कृती आराखडा’ अंतर्गत ‘गुंतवणूक प्रसार कृती कार्यक्रम’ राबवण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. औद्योगिक गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे, स्थानिक व्यापारी, उद्योजक व कामगार संघटनांशी संवाद वाढवणे, गुंतवणूकदारांना कायदेशीर व प्रशासकीय सहकार्य पुरवणे ही या कक्षाची मुख्य उद्दिष्ट आहेत. तसेच ‘उद्योग सुविधा कक्ष’ आणि ‘उद्योग सारथी’ पोर्टलच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम केली जात आहे. या पोर्टलवरून उद्योजकांना परवाने, मंजुरी आणि इतर शासकीय सुविधा एका क्लिकवर मिळतील. तसेच थेट संवादामुळे त्यांच्या समस्या जलदगतीने सोडवता येतील, असेही अतिरिक्त आयुक्त खोराटे यावेळी म्हणाले.

उद्योग सुविधा कक्षात नियमित संवाद बैठका आयोजित करण्यात येतील. त्यामध्ये क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत मासिक बैठकांद्वारे स्थानिक प्रश्नांवर चर्चा व उपाय, आयुक्तस्तरीय त्रैमासिक बैठकांद्वारे धोरणात्मक संवाद तसेच CSR उपक्रम, कल्याणकारी योजना, आरोग्य, शिक्षण व सामाजिक विकास यांची माहिती देणारी सेवा पुरविण्यात येणार असल्याची माहिती मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी यांनी दिली.

उद्योग सुविधा कक्षाचे संचालक विजय वावरे यांनी उद्योजकांनी ‘उद्योग सारथी’ पोर्टलवर अधिकाधिक नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी केले. तसेच पुढील काळात विविध उद्योग संघटनांसोबत सल्लामसलत बैठकांचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण यांनी केले. यावेळी इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी महापालिकेच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत उद्योजकांच्या वतीने पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 52
Tags: Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा बुधवारी नागरी सत्कार – योगेश बहल
Next: शाळकरी विद्यार्थ्यांच्या चित्रांनी जिंकली मने!

Related Stories

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे 08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba 1

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

01/06/2026
एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार 88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5 2

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

01/06/2026
बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f 3

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

23/05/2026
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba 4

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

19/05/2026
असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे 74db5dbb-9370-4788-826a-c0a38da06088 5

असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

17/05/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

08f4fa96-6b7d-4b57-9ffd-81ade35fb5ba
  • Daily Breaking News
  • Crime News

पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे

suwarna gaware 01/06/2026
88631810-11a6-48ad-979c-41266b0754e5
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार

suwarna gaware 01/06/2026
ca87ec3e-75dc-47c7-8614-8e7ec98cac8f
  • Daily Breaking News
  • Cultural

बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस

suwarna gaware 23/05/2026
2d309898-1c2f-4f79-9ef8-e2c8de2305ba
  • Daily Breaking News
  • Cultural
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

suwarna gaware 19/05/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • पोलीस आयुक्तांची तात्काळ उचलबांगडी करा : देवेंद्र तायडे
  • एसटीच्या वर्धापन दिनी कष्टकरी संघर्ष महासंघा तर्फे चालक, वाहकांचा सत्कार
  • बदलत्या काळातही कामगार लढेल आणि जिंकेल – डॉ श्रीपाल सबनीस
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादितची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
  • असंघटित कामगारांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार महेश लांडगे

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.