


पिंपरी, ता. ७ -चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत गरजू व आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी पूर्वी महापौर निधी दिला जात होता. या निधीतून हृदय शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, डायालिसिस, कर्करोग इत्यादी गंभीर आजारांवरील उपचारांसाठी गरजूंना मदत केली जात होती.

मात्र, गेल्या काही वर्षांपासून महापौर निधी पूर्णतः बंद आहे. २०१९ पासून महापौर नसल्यामुळे आपल्यामार्फतच महापालिकेचे सर्व प्रशासकीय निर्णय घेतले जात आहेत.
त्यामुळे सद्यस्थितीत महापौर निधीचा लाभ थांबवण्यात आला असून, याचा थेट परिणाम गोरगरीब रुग्णांवर होत आहे. अनेक रुग्ण आर्थिक मदतीअभावी वेगवेगळ्या सामाजिक संस्थेकडे निधीसाठी धाव घेत आहेत व योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे अडचणीत येत आहेत. पैसेअभावी रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
तरी, मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि सामाजिक बांधिलकीतून या निधीचे लेखापरीक्षण लवकरात लवकर पूर्ण करून गरजू रुग्णांसाठी महापौर निधी पुन्हा सुरुवात करावे. प्रशासनाने या निधीच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक ती कार्यवाही करून गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा, ही विनंती.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
