


पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य आशा बाबा कांबळे यांची मागणी.

पिंपरी, ता. ४: पिंपरी चिंचवड शहरांमध्ये भूमाफीया निर्माण झाले असून हे भूमाफिया गोरगरीब टपरी चालक हातगाडी चालक फळभाजी विक्रेते यांच्याकडून भाडे वसुली करत आहेत या भाडे वसुलीचा दर दररोज शंभर ते पाचशे रुपये आहे.
हे अत्यंत गंभीर बाब असून, पिंपरी चिंचवड शहरामध्ये गोरगरीब मागासवर्गीय टपरी पथारी हातगाडी धारक फळ भाजी विक्रेते फेरीवाले, यांच्यासाठी फेरीवाला धोरण कायदा मंजूर झाला असून,
टपरी पथारी हातगाडी पंचायत संस्थापक अध्यक्ष गोरगरीब कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षापासून पिंपरी चिंचवड शहरांमध्ये संघर्ष करून राष्ट्रवादी दिल्यामुळे हा कायदा अस्तित्वात आला आहे,
नुकतेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने फेरीवाला कमिटीच्या सदस्यांची निवडणूक देखील घेतली या निवडणुकीमध्ये मी बहुमताने निवडून आले असून, टपरी पथारी हातगाडी धारकांनी लोकशाही मार्गाने मतदान करून मला निवडून दिले आहे,
निवडून आलेल्या प्रतिनिधींना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने विश्वासात घेऊन पिंपरी चिंचवड शहरांमध्ये फेरीवाला धोरणाचे तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक आहे महानगरपालिका फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करत नसल्यामुळे असे प्रकारसमोर येत असून, यातून गोरगरीब कष्टकरी फेरीवाल्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये पिळणूक होत आहे व त्यांच्यावर अन्याय देखील होत आहे,
यात गरीब कष्टकरी विधवा, परित्यक्ता ,महिलांचे तर परिस्थिती अत्यंत बिकट असून त्यांना या विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे,
या सर्व प्रकरणाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तसेच पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त यांनी दखल घ्यावी व चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील निवेदनाद्वारे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका फेरीवाला समिती सदस्य आशा कांबळे यांनी केले आहे,

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
