Skip to content
09/06/2025
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड़ .com

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

cropped-images.jpeg

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2024
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • टू व्हीलर टॅक्सी बाईक विरोधात ऑटो टॅक्सी चालकांनी एकत्र यावे – बाबा कांबळे
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

टू व्हीलर टॅक्सी बाईक विरोधात ऑटो टॅक्सी चालकांनी एकत्र यावे – बाबा कांबळे

suwarna gaware 02/04/2025
6b5f9c8e-dc29-4227-9c6e-b6ce21111faa
Spread the love

– सरकारने ताबडतोब निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय.

उद्या पुणे पिंपरी चिंचवड आरटीओ ला देणार निवेदन

पिंपरी ! प्रतिनिधी, ता. २: महाराष्ट्र सरकारने टू व्हीलर टॅक्सीला महाराष्ट्रामध्ये परवानगी दिली आहे. यापूर्वी पुणे शहरामध्ये टू व्हीलर बाइक टॅक्सी रॅपिडो या कंपनीने सुरू केली होती. त्यास पुणे पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालक – मालकांनी प्राणपणाने तीव्र लढा दिला. ही रॅपिडो टू व्हीलर टॅक्सी पुणे, पिंपरी चिंचवड शहरांमध्ये व महाराष्ट्रामध्ये बंद केले आहे.

एकजुटीने टू व्हीलर टॅक्सी बाईक धोरण हाणून पाडू असे प्रतिपादन ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी केले. रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी एकत्र येण्याचे आवाहनी बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

बाबा कांबळे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयामध्ये नंतर दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयामध्ये याबद्दलची सुनावणी चालली. त्यामध्येही महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, तसेच ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांनी सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालयांमध्ये देखील आम्ही लढाई जिंकलो. परंतु यानंतर मात्र महाराष्ट्र सरकारने झा समिती स्थापन केली. समितीने चुकीच्या पद्धतीने शिफारशी केल्या. त्या शिफारशीच्या आधारे महाराष्ट्रामध्ये टू व्हीलर टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.

लवकरच महाराष्ट्रातील सर्व संघटनांना सोबत घेऊ आणि “महाराष्ट्र रिक्षा पंचायत, ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य, ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशन (दिल्ली) यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्व संघटनांना सोबत घेऊन राज्यव्यापी व देशव्यापी आंदोलनाची तयारी देखील करणार असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले आहे.

चौकट : २५ लाख बेरोजगार होणार –

टू व्हीलर टॅक्सी बाईकमुळे महाराष्ट्रातील 20 लाख ऑटो चालक मालक तसेच पाच लाखापेक्षा अधिक टॅक्सी चालक-मालक बेरोजगार होणार आहेत. याबरोबरच महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे संपुष्टात येणार आहे. या अगोदरच आर्थिक अडचणीमध्ये असल्याने ऑटो आणि टॅक्सी चालक, यांच्या वरती आत्महत्या करण्याची वेळ येईल. कर्ज फेडणे, परिवाराची उपजीविका, मुलांचे शिक्षण असे अनेक प्रश्न उभे राहतील असे बाबा कांबळे म्हणाले.

चौकट : आरटीओला निवेदन देणार –
उद्या 3 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता, पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय येथे निवेदन देण्यात येणार आहे. त्यासाठी रिक्षा टॅक्सी चालक मालकांनी एकत्र यायचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले आहे. दुपारी 2 वाजता पुणे आरटीओ येथे एकत्र जमून निषेध नोंदविण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया :
शासनाच्या धोरणामुळे अनेक आर्थिक व सामाजिक प्रश्न उभे राहणार आहेत. या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. टू व्हीलर टॅक्सी विरोधामध्ये उद्या गुरुवारपासून (दि. ३) आंदोलनाची सुरुवात करत आहोत.

– बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र रिक्षा पंचायत, आटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 56
Tags: #baba kamble Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ९७ जुन्या वाहनांचा लिलाव – लघुत्तम रकमेपेक्षा १९.८२% अधिक महसूल प्राप्त
Next: पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त अहिंसा सप्ताह ,अहिंसा रॅली ,पुरस्कार

Related Stories

4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

suwarna gaware 09/06/2025
1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200
  • Daily Breaking News
  • Poilitical

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

suwarna gaware 09/06/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह 4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b 1

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

09/06/2025
प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी 1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200 2

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

09/06/2025
आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा.. 7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13 3

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

09/06/2025
सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार! 8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc 4

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

07/06/2025
पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प” IMG_1451 5

पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

06/06/2025

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

4cb219fc-5f27-4d61-8226-5d187fabc65b
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह

suwarna gaware 09/06/2025
1c76d43f-e3c6-45fe-a212-551c14890200
  • Daily Breaking News
  • Poilitical

प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी

suwarna gaware 09/06/2025
7dc06e05-dbbb-4f9a-8c47-c641f4f6fc13
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..

suwarna gaware 09/06/2025
8bfbf703-caef-47d4-8f2e-ec12520278cc
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!

suwarna gaware 07/06/2025

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • ‘सुनियोजित विकासासाठी प्रशासन कटिबद्ध!’ – आयुक्त शेखर सिंह
  • प्रभाग ‘ह’ मधील दीर्घकाळ प्रलंबित नागरी समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी
  • आयुक्त साहेब , रिंग करण्याच्या प्रयत्नात अडकली बेंच खरेदी निविदा..
  • सुधारित विकास आराखडा: मोशीत कत्तलखाना नव्हे, गोशाळा होणार!
  • पर्यावरण दिनी ‘एक झाड  एक आशा’ उपक्रम: आमदार अमित गोरखे यांचा विद्यार्थ्यांसह हिरवा संकल्प”

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.