


पुणे, २५ मार्च २०२५: डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे यांनी यशस्वीपणे इग्नाईट (IGNITE) २०२५ हे अंडरग्रॅज्युएट संमेलन आयोजित केले. या संमेलनात शैक्षणिक सहभाग आणि प्रतिभा-केंद्रित उपक्रमांवर भर देण्यात आले. महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित या संमेलनात प्री-क्लिनिकल विषय – शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र आणि जैवरसायनशास्त्र यांचा समावेश होता. पुण्यातील आठ प्रमुख वैद्यकीय महाविद्यालयांतील ४५० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला, यामध्ये डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे, बी.जे.एम.सी., ए.एफ.एम.सी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, एमआयएमईआर तळेगाव, एस.के.एन.एम.सी, भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालय आणि सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश होता.

या कार्यक्रमात तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते – पोस्टर मेकिंग, मॉडेल मेकिंग आणि रांगोळी स्पर्धा. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील २५० विद्यार्थ्यांनी आणि इतर संस्थांमधील २०० विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. विद्यार्थ्यांचे पाच जणांच्या ५० संघांमध्ये विभाजन करण्यात आले होते, यामध्ये शरीरशास्त्रासाठी १७ संघ, शरीरक्रियाशास्त्रासाठी १७ संघ आणि जैवरसायनशास्त्रासाठी १६ संघ होते.
स्पर्धांचे परीक्षण करण्यासाठी प्रतिष्ठित वैद्यकीय संस्थांमधून ३२ हुन अधिक मान्यवर परीक्षक म्हणून होते तसेच सहभागी संस्थांचे वरिष्ठ प्राध्यापक देखील उपस्थित होते, ज्यांनी विद्यार्थ्यांना मौल्यवान मार्गदर्शन दिले आणि डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजची वैद्यकीय शिक्षणातील शैक्षणिक उत्कृष्टता आणि नवोपक्रमासाठीची वचनबद्धता बळकट झाली.
या कार्यक्रमासाठी विविध श्रेणींमध्ये सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आले ज्यामध्ये शरीरशास्त्र रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक सिम्बायोसिस वैद्यकीय महाविद्यालयाने मिळवला, तर शरीरशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेत तळेगाव येथील एमआयएमईआर ने विजेतेपद पटकावले. शरीरशास्त्र पोस्टर स्पर्धेत ए.एफ.एम.सी. ने प्रथम क्रमांक मिळवला.
जैवरसायनशास्त्र रांगोळी गटात बी.जे.एम.सी. ने प्रथम क्रमांक पटकावला, एस.के.एन.एम.सी. ने मॉडेल मेकिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, तर ए.एफ.एम.सी. ने जैवरसायनशास्त्र मॉडेल मेकिंग गटात बाजी मारली. शरीरक्रियाशास्त्र रांगोळी गटात एमआयएमईआर, तळेगाव ने प्रथम क्रमांक मिळवला, तर शरीरक्रियाशास्त्र मॉडेल मेकिंग स्पर्धेत ए.एफ.एम.सी. विजयी ठरले. शरीरक्रियाशास्त्र पोस्टर मेकिंग स्पर्धेत एस.के.एन.एम.सी. ने प्रथम क्रमांक पटकावला. सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी विलक्षण सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारसरणी प्रदर्शित केली. या संमेलनाने विद्यार्थ्यांना एक अद्वितीय व्यासपीठ उपलब्ध करून दिले, जिथे त्यांनी आपली प्रतिभा प्रदर्शित केली, संघशक्तीने काम केले आणि त्यांच्या ज्ञानाचा विकास केला.
मा. डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्र कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (अभिमत विद्यापीठ), पिंपरी, पुणे यांनी सांगितले, “इग्नाईट युजी कॉनक्लेव्ह २०२५” (IGNITE UG Conclave) आमच्या भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांना शैक्षणिक उत्कृष्टता, नवोन्मेष आणि संघभावना विकसित करण्याच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे. डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय विद्यार्थ्यांना फक्त शिक्षण देत नाही, तर त्यांना स्वावलंबी आणि नवोन्मेषी बनवण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रदान करते. हा उपक्रम आमच्या व्यापक आणि दूरदृष्टीने वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”
डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ) विश्वस्त आणि खजिनदार डॉ. यशराज पाटील यांनी नमूद केले, “विविध संस्थांमधून प्रतिभावान विद्यार्थी एकत्र आणून आम्ही अशा व्यासपीठाची निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहोत, जे केवळ विषयज्ञान वाढवेलच नाही, तर संघभावना, सर्जनशीलता आणि चिंतनशील विचारसरणी विकसित करण्यास मदत करेल – जे भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अत्यावश्यक आहेत. आम्हाला ही परंपरा प्रस्थापित करताना अभिमान वाटतो आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगात सहज संक्रमण करण्याच्या संधी मिळाव्यात यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील राहू.”
डॉ. रेखा आर्कोट, अधिष्ठाता, डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे, यांनी वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिभाविकासाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले, “वैद्यकीय क्षेत्रात प्रतिभाविकास म्हणजे केवळ ज्ञान मिळवणे नव्हे, तर सातत्याने शिकणे आणि संघशक्तीने कार्य करणे हा त्याचा गाभा आहे. इग्नाईट (IGNITE) सारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी, सर्जनशील विचार करण्यासाठी आणि प्रभावीपणे सहकार्य करण्यासाठी एक आदर्श व्यासपीठ उपलब्ध होते.”
About Dr. D. Y. Patil Medical College, Hospital and Research Centre, Pimpri, Pune:
Dr. D. Y. Patil Medical College, Hospital & Research Center, Pimpri, Pune follows international benchmarks that are performance-driven as well as patient-centric, strongly backed by evidence-based medical expertise. We are NABH and NABL accredited and have been certified as a Green Hospital by the Association of Healthcare Providers India (AHPI). Additionally, we hold the 11th rank in the National Institutional Ranking Framework (NIRF). The university has been awarded A++ status by the National Assessment and Accreditation Council (NAAC) and is an ISO 2015-certified organization (ISO 9001: 2015).
For more information visit https://medical.dpu.edu.in/
• Facebook: Dr D Y Patil Medical College, Hospital and Research Centre
• Instagram: dpu.medicalcollege

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️