


पिंपरी, ता. २२: यमुनानगर निगडी येथील पी.ई.एस.एस.मॉडर्न प्री.प्रायमरी,व प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल येथे दि.२१ मार्च २०२५ शुक्रवार रोजी वार्षिक क्रिडा बक्षिस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर प्रतीक भिंगारदिवे(PSI,निगडी शाखा) गणेश शेलार(हवालदार निगडी शाखा) दामिनी पथकातील निगडी शाखेच्या उषा हंगारे आणि प्रियंका बच्चाव,शाळा समिती अध्यक्ष यशवंत कुलकर्णी,व्हीजिटर डॉ.प्रो. अतुल फाटक आणि प्रा.शशिकांत ढोले,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे,मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रतीक भिंगारदिवे यांनी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा देताना आपल्या आयुष्यात अभ्यासाबरोबर पौष्टिक आहार, व्यायाम आणि खेळही महत्वाचा असल्याचे सांगितले.यशवंत कुलकर्णी यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शाळेत होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घ्यावा असे सांगितले.तसेच अविरत मेहनतीने जीवनातील सर्व आव्हानावर मात करता येते असे सांगितले.या स्पर्धा केवळ महत्त्वाच्या क्षमता विकसित करत नाहीत तर भविष्यातील यशाचा पाया देखील रचतात असे सांगितले.
प्रा.शशिकांत ढोले यांनी विद्यार्थ्यांनी जर आत्ता मेहनत केली तरच पुढील आयुष्य सुखाचे जाईल असा मोलाचा संदेश दिला. यावेळी वर्षभरातील विविध स्पर्धेतील सर्व विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी,प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शीतल कोराड तर आभार लीना पगारे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
शाळेचे चेअरमन शामकांत देशमुख आणि संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबोटे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
