


प्रभाग क्रमांक ३ मध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती

चऱ्होली, ता.५ : आमदार महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली व शिवांजली सखी मंचाच्या पूजा ताई लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मकर संक्राती निमित्त चऱ्होली मधील युवा नेते व भाजपा प्रभाग अध्यक्ष सुनील अण्णा काटे व महाराणी येसूबाई महिला बचत गट अध्यक्षा ज्योती ताई काटे यांच्या माध्यमातून चऱ्होली प्रभाग क्रमांक ३ मध्ये मोठ्या उत्साहवर्धक वातावरणात हळदी कुंकू समारंभ पार पडला. या समारंभास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
सदर हळदी कुंकू समारंभ दि.२ फेब्रुवारी रोजी सुनील अण्णा काटे जनसंपर्क कार्यालय, काटेनगर, आळंदी रोड येथे पार पडला. संपूर्ण चऱ्होली प्रभागातून सुमारे १५०० सौभाग्यवतीनी सहभाग नोंदवला. महिलांनी वाण लुटून आनंद व्यक्त केला.
प्रतिक्रिया-
महिलांसाठी दरवर्षी आम्ही सामाजिक उपक्रम प्रभागात राबवित असतो. त्यानिमित्त महिलांना व्यासपीठ मिळून त्या स्वावलंबी बनण्यास मदत होते. इथून पुढे देखील असे विविध उपक्रम व योजना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राबविण्याचा आमचा मानस आहे. प्रभागातील माता भगिनीच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी आमची सदैव तत्परता आहे.
- ज्योती ताई काटे, महाराणी येसूबाई महिला बचत गट अध्यक्षा, चऱ्होली

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️