


पुणे: दि :-२३ जानेवारी रोजी विद्या प्रतिष्ठान अनंतराव पवार स्कुल च्या मुलांनी झालेल्या ग्रेडेशन कॅम्प मध्ये सर्व स्कुल ने सहभाग नोंदविला होता. यामध्ये मुलांना कराटे,पिंच्याक सिलाट आणि सिलंबम (शिवकालीन युद्ध कला) इत्यादीचे प्रशिक्षण मास्टर साहेबराव ओहोळ हें देत होते.

या स्कुल च्या मुलांनी जिल्हा लेवल राज्य लेवल व राष्ट्रीय स्पर्धे मध्ये स्कुल चे नाव गाजवले आहे. तसेच खेलो इंडिया उमन्स लीग मध्ये ही स्कुल च्या 40 मुलींनी सहभाग नोंदवून अतिशय देदीप्यामान कामगिरी केली आहे. या सर्व मुलांना स्कुल च्या प्रिन्सिपल श्रीमती सरिता शिंदे मॅडम यांनी मुलींना सक्षम करण्यासाठी स्कुल मध्ये सेल्फ डिफेन्सचे ट्रेनिंग साहेबराव ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केले.
मुलींचा सर्वांगीण विकास व्हावा व मुलांची बौद्धिक, शाररिक क्षमता विकसित व्हावी म्हणून स्कुल मध्ये हा प्रोजेकट गेली चार वर्ष सुरु आहे. आणि याचे फलित आज स्कुलच्या 201 मुलांचे बेल्ट ग्रेडेशन होऊन मुलांना येलो, ऑरेंज, ग्रीन इत्यादी बेल्ट देऊन सन्मानित केले गेले. हें ग्रेडेशन करण्यासाठी ग्रँडमास्ट संजय आनंदकर, अनिल दुबळे, जयश सर, सिद्ध सर, अमृत मलगुंडे, शर्मा मॅडम, आदित्य आटोळे, दिनेश तावरे, यशश्री माने इत्यादीच्या मार्गदर्शनाखाली पार पढली.
या सर्व मुलांना स्कुलच्या प्रिन्सिपल सरिता शिंदे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व मुलांनी येणाऱ्या काळात स्कुलचे व आपल्या आई वडिलांचे नाव गाजवावे अशी आशा वेक्त केली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
