


राज्यातील तमाम नाभिक बांधवांना जाहीर आवाहन

पुणे, ता.८ : राज्यातील सकल नाभिक समाजाला कळविण्यात येते की भोर तालुक्यातील अंबावडे या गावामध्ये राज्यातील तमाम नाभिक बांधवांनी आपले शक्तीस्थान शिवरक्षक जिवाजी महाले यांच्या समाधीस्थळी दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे.
या कार्यक्रमाला राज्यातील, जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून तमाम नाभिक बांधव उपस्थित राहणार आहेत. आपले शुरवीर जिवाजी महाले यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन जाणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमाला आपणही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, हि नम्र विनंती आहे. अशी विनंती आयोजक शिवरत्न जिवाजी महाले उत्सव समिती, पुणे जिल्हा, तालुका भोर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️