


पिंपरी चिंचवड महानगरपालिका व व मेसर्स पुणे अर्बनली संस्थेचा अभिनव उपक्रम

पिंपरी, दि. ३ जानेवारी २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेसर्स पुणे अर्बनली संस्थेच्या वतीने पिंपळे सौदागर येथील लिनिअर गार्डन येथे ‘ फार्मर स्ट्रीट’ चे आयोजन करण्यात आले आहे.

या ठिकाणी पुढील दोन दिवस (४ व ५ जानेवारी) सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत रंगणाऱ्या या कार्यक्रमात नैसर्गिक व ताज्या फळे व भाजीपाला विक्री, नैसर्गिक सौंदर्य प्रसाधने या सोबतच मनोरंजनाचा देखील कार्यक्रम होणार आहेत. या फार्मर स्ट्रीट मध्ये शेतकरी, नर्सरी यांच्या सोबतच फूड प्रोसेसिंग कंपन्या आपला माल विक्रीसाठी घेऊन येणार आहेत.
यात ऑरगॅनिक शेती माल, प्रोसेसेड फूड, नॅचरल सौंदर्यप्रसाधने याशिवाय इतर मालाचा देखील समावेश असणार आहे. यावेळी होणाऱ्या मोफत मनोरंजन कार्यक्रमामध्ये झुंबा, योगा, ड्रम सर्कल व लाईव्ह सिंगर चा कर्यक्रम होणार आहे. मावळा तर्फे लहान मुलांसाठी ‘रणांगण’ नावाचा खेळ घेतला जाणार आहे.
या फार्मर स्ट्रीट कार्यक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना घ्यावा असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह व उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे उपआयुक्त उमेश ढाकणे यांनी केले आहे. शहराची वाढती लोकसंख्या तशी बाजारातील भाजीपाल्यांची गरज देखील वाढत आहे. अशावेळी बाजारात रासायनिक प्रक्रिया केलेला भाजीपाला दिसून येतो.
अशा प्रकाराला आला घालण्यासाठी उपाय योजना करणे आवश्यक आहे. म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील असते. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजार भाव मिळावा व मध्यमवर्गीयांना देखील योग्य किमतीत भाजीपाला मिळावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
यातून शहरातील मध्यमवर्गीय नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध होणार आहे. शिवाय मोफत मनोरंजन देखील होणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक
४ जानेवारी : सकाळी ७:०० वाजता – मोफत झुंबा डान्ससकाळी ७:०० ते सायंकाळी ९:०० वाजेपर्यंत – फार्मर स्ट्रीट प्रदर्शनसायंकाळी ६:०० वाजता – ड्रम सर्कल ५ जानेवारी सकाळी ७:०० वाजता – मोफत योगासकाळी ७:०० ते सायंकाळी ९:०० वाजेपर्यंत – फार्मर स्ट्रीट प्रदर्शन सायंकाळी ६:०० वाजता – लाईव्ह सिंगर
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या फार्मर स्ट्रीट प्रदर्शन उपक्रमात शहरातील नागरिकांना सहभागी घ्यावा व नैसर्गिक उत्पादन प्रदर्शनासोबतच मोफत होणाऱ्या मनोरंजन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह , आयुक्त तथा प्रशासक ,पिंपरी चिंचवड महानगरपालिका

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️