


मोशी: संत तुकारामनगर मध्ये अनेक मोकाट कुत्री झाली आहेत. अनेक वेळा लहान मुलाना चावली आहेत. पण, पिंपरी चिंचवड महानगर पालिका प्रशासनाकडून योग्य ती कारवाई होत नाही.

३१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता आदित्य आनंद आव्हाड या ९ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावा घेतला आहे. गेल्या 15 ते 20 दिवसापासून 3 कुत्री व त्याची 5 पिल्ले परिसरात फिरत आहेत. संत तुकाराम नगर परिसरात दर 8 दिवसात व्यक्तींना चावा घेतला जात आहे.
लहान मुलाला रक्त बांबाळ केल्याने नागरीक संतप्त झाले आहेत. भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करून योग्य ती करवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्वरित वायसीएम हॉस्पिटला रुग्णाला दाखल करण्यात आले. तसेच अँटी रेबीज लस देण्यात आली. अशी माहिती धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी सांगितले.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
