


पिंपरी,प्रतिनिधी ता.२३ , शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली व लातूर जिल्हा अध्यक्ष ज्योतीराम जावळे यांच्या सोबतीला गाव आटोळा, तालुका चाकूर. जिल्हा लातूर. या गावच्या नियुक्ती पुढील प्रमाणे :-

आटोळा शाखाध्यक्ष* १)हनुमंत सुदाम कळवले. *शाखा उपाध्यक्ष* २)अशोक पंढरी करवले.*शाखा खजिनदार* ३)शंकर उत्तम कळवले. *शाखा सचिव*४) शत्रगुण जनार्दन कळवले.*निगडी विभाग* ५)ज्येष्ठ अध्यक्ष बाप्पू डोंगरे. *महाराष्ट्र राज्य वरीष्ठ उपाध्यक्ष* ६)माणिकराव पौळ*
अध्यक्ष खेड तालुका*७)अजय कसबे *अध्यक्षा मावळ लोकसभा* ८)भारतीताई चांदणे.*उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर*९)रतन जाधव यांच्या नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्रक संस्थापक/ अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पूर्णाकृती स्मारक निगडी या ठिकाणी देण्यात आले.
नियुक्ती प्रधान कार्यक्रमाच्या सुरुवातीला आटोळा गावचे पदाधिकारी सकल मातंग समाज आटोळा गाव व शिवशाही व्यापारी संघ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती स्मारकास दूध अभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरांमध्ये चालू करण्यात आलेल्या या प्रथेला आटोळा गावचे पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.दरम्यान नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देऊन व्यापारी वर्ग महिला भगिनी सर्वसामान्य नागरिक यांच्या सेवेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना विनंती लोकसेवक युवराज दाखले यांनी केली.
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे शिवशाही व्यापारी संघ वरिष्ठ उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य माणिकराव पौळ, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाकोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले,पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, मावळ लोकसभा अध्यक्षा भारतीताई चांदणे, आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
