


शिक्षण आणि संस्कार यांचा उत्तम संगम म्हणजे आचार्य आनंद ऋषीजी स्कूल–अविनाशजी चोरड़िया

कासारवाडी , पुणे ता. २२: आचार्य आनंदऋषीजी स्कूल कासारवाडी, पुणे या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
या समारंभास प्रमुखातिथी म्हणून ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स चे पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष श्री अविनाशजी चोरडिया आणि दक्षिण भारत जैन महासभेचे उपाध्यक्ष श्री मिलिंद फडे , गौतम निधी फौंडेशनचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी मुनोत , अभिनेता संदीप साकोरे हे उपस्थित होते अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया होते.
यावेळी संस्थेचे विश्वस्त महावीर कुवाड , कल्पेश पगारिया तसेच सौ लता पगारिया ,मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा मुंगी , प्रमुख सल्लागार सौ मेघना जोशी हे मंचावर उपस्थित होते. शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर रीतीने सादर केले विशेषत्वाने भारतीय सण आणि परंपरा गणेश पूजन ,भारत माता, जय जवान, संत गोरा कुंभार अशा अनेक विषयावरील गीतांच्या माध्यमातून सुंदर कार्यक्रम सादर केला.
यावेळी बोलताना अविनाशजी चोरडिया म्हणाले” या शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांच्या विकास करण्यासाठी आणि त्यांच्यावर सुसंस्कार घडवण्यासाठी शाळेचे व्यवस्थापन ,मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षक वर्ग प्रयत्नशील आहेत आज विद्यार्थ्यांवर नीती मूल्यांचे संस्कार घडवण्याची आवश्यकता आहे आणि ते काम या शाळेत केले जाते याचे विशेष समाधान आहे .श्री मिलिंद फडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेच्या कामाची प्रशंसा केली आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राजेंद्र मुनोत आणि संदीप साकोरे यांनी आपल्या मनोगता तून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शाळेची माहिती सांगितली आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेता यावे या उद्देशातून शाळेची स्थापना २५ वर्षांपूर्वी केल्याचे सांगितले .
या शाळेचे अनेक विद्यार्थी उच्चशिक्षित झाले असून त्यामध्ये डॉक्टर इंजिनियर ,चार्टर्ड अकौटंट झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.श्रीमती सुलभा मुंगी यांनी शाळेचा अहवाल वाचून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.सुवर्णा शिंदे यांनी केले शाळेच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाचे संयोजन नियोजन केले व शेवटी आभार दिव्या शितोळे यांनी करून कार्यक्रमाची सांगता झाली.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
