Skip to content
03/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शत्रूनेही गौरविलेल्या स्वा. सावरकरांची स्वकीयांकडून होणारी उपेक्षा ही शोकांतिका – अपर्णा कुलकर्णी
  • Cultural
  • Daily Breaking News

शत्रूनेही गौरविलेल्या स्वा. सावरकरांची स्वकीयांकडून होणारी उपेक्षा ही शोकांतिका – अपर्णा कुलकर्णी

suwarna gaware 18/12/2024
IMG-20241218-WA0009
Spread the love

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

चिंचवड, दि. १८ डिसेंबर २०२४ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फक्त देशातून नव्हे तर थेट शत्रूच्या घरात घुसून स्वातंत्र्याची लढाई लढली. इंग्लडमधील ज्या ‘इंडिया हाऊस’ मध्ये वास्तव्य करून सावरकरांनी या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतिनिधित्व केले. त्याच इंडिया हाऊसच्या बाहेर आज तेथील ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या गौरवार्थ फलक लावला आहे. म्हणजे ज्या इंग्रज सरकारविरोधात लढण्यात सावरकरांनी आपले आयुष्य पणाला लावले त्या शत्रूने त्यांचा गौरव केला.

मात्र दुसरीकडे ज्या देशवासीयांसाठी त्यांनी हा लढा लढला त्याच देशवासीयांकडून आज त्यांची उपेक्षा होत आहे, यासारखी दुसरी शोकांतिका नाही, असे प्रतिपादन व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी यांनी केले.चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्यात मंगळवारी (दि. १७) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर अपर्णा कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज हे उपस्थित होते.आपल्या व्याख्यानात अपर्णा कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यातील झंझावाती कार्याचे साक्षीदार असलेल्या आठ महत्वपूर्ण स्थानांची महिती आणि माहिती सांगितली. त्या म्हणाल्या की, ज्याप्रमाणे श्री गणरायाची आठ महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र अष्टविनायक म्हणून ओळखली जातात.

त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनात या आठ ठिकाणांना अष्टविनायकाएवढेच महत्व आहेत. ज्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर आपल्याला देशप्रेमाची प्रेरणा मिळते.या ठिकाणांमध्ये पहिले सावरकरांचे नाशिक येथील जन्मस्थान, दुसरे नाशिक येथील भगूर या ठिकाणी असलेल्या अष्टभुजा देवीचे मंदिर ज्याठिकाणी त्यांनी “मारता मारता मरेतो झुंजेन” ही स्वातंत्र्यलढ्याची सशस्त्र क्रांतीची पहिली प्रतिज्ञा घेतली, तिसरे ठिकाण नाशिकमधील तीळभांडेश्वराच्या गल्लीतील भाड्याचे घर ज्याठिकाणी त्यांनी मित्र मेळ्याच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यप्राप्तीचे बीज रोवण्याचे काम केले.

पुढील चौथे ठिकाण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज येथील जेन्ट्स ब्लॉकमधील खोली क्रमांक १७. याठिकाणी त्यांनी समवयस्क आणि समविचारी मित्रांना एकत्रित करून त्यांनी अभिनव भारत संघटनेची मुहूर्तमेढ रोवली. पुढे पाचवे ठिकाण ते थेट लंडनमधील इंडिया हाऊस ही वास्तू, याठिकानाहूनच सावरकर यांनी भारतातील क्रांतीकारकांना अत्याधुनिक शस्त्र पुरविण्याचे क्रांतिकारी कार्य केले. पुढे सहावे ठिकाण म्हणजे मार्सेलिनचा किनारा, ज्यावेळी सावरकरांना व्हिक्टोरिया स्टेशनवर अटक करून खटला चालविण्यासाठी त्यांना ‘मोरया’ बोटीमधून भारतात आणण्यात येत असते.

यावेळी बोटीच्या पोर्ट होलद्वारे ते समुद्रात उडी मारतात. मात्र मार्सेलीनच्या किनाऱ्यावर त्यांना पुन्हा पकडण्यात येते. त्यांच्या अष्टविनायकातील सातवे ठिकाण म्हणजे अंदमानचे तुरुंग ज्याठिकाणी त्यांनी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली. तर शेवटचे आठवे ठिकाण म्हणजे रत्नागिरी येथील स्थानबद्धतेत राहिलेले ठिकाण, ज्याठिकाणी त्यांनी हिंदू धर्मातील स्पृश्य-अस्पृश्यतेच्या भेदाभेदीच्या भिंती तोडण्यासाठी जीवाचे रान केले. याठिकानीच त्यांनी पतित पावन मंदिर बांधले.

व आयुष्याच्या शेवटी मुंबईतील दादर येथील सावरकर सदन याठिकाणी आपला देह ठेवला.प्रत्येक भारतवासीयांनी आयुष्यात किमान एकदा तरी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या आठ प्रेरणास्थळांना भेट द्यावी. परदेशातील शक्य नसले तरी किमान महाराष्ट्रातील स्थळांना भेट देऊन स्वातंत्र्यवीरांच्या देशप्रेमाची प्रेरणा प्रत्येकाने आत्मसात केली पाहिजे अशा भावना, व्याख्यात्या अपर्णा कुलकर्णी यांनी आपल्या व्याख्यानाच्या शेवटी व्यक्त केल्या.

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 53
Tags: #स्वा. सावरकर Pcmc Pimpri and Chinchwad

Continue Reading

Previous: संजीव अभ्यंकर यांच्या ‘स्वररंजन भक्तिरसात’ रसिकश्रोते तल्लीन
Next: पशुपालकांनो पशुगणना करा

Related Stories

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान 8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988 1

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

03/03/2026
महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार! 47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d 2

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

02/03/2026
नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 3

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 4

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 5

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

8a850c36-ec06-4f46-93c8-244ed5758988
  • Daily Breaking News
  • Cultural

महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान

suwarna gaware 03/03/2026
47e01899-2556-4828-98dc-a3dc43a85f8d
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!

suwarna gaware 02/03/2026
271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • महा. अंनिस, पिंपरी शाखेच्या प्रयत्नाने, होळीची पुरणपोळी गरीबांना दान
  • महिंद्रा लॉजिस्टिक लि. मध्ये ऐतिहासिक वेतनवाढ करार!
  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.