


मोशी, ता. १३ : नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी पुण्यातील मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलच्या वतीने श्रावणी सस्ते हिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

या स्पर्धेत शाळेतील इयत्ता दहावीतील श्रावणीने कराटे स्पर्धेत कांस्य पदक मिळवत उज्जवल यश प्राप्त केले.शाळेने वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आणि मार्गदर्शनामुळे तिने ही कामगिती केली आहे. प्रियदर्शनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वेळोवेळी विविध क्रीडा स्पर्धांत चमकदार कामगिरी केली आहे.पुण्यातील मोशी येथील प्रियदर्शनी स्कूलचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच कला व क्रीडा क्षेत्रातही यश संपादन करत आहेत.

श्रावणी सस्ते हिने राज्य स्तरावरील स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शाळेचा झेंडा दिल्लीत पडकवला आहे.श्रावणी सस्ते हिला शाळेकडून कराटे स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्यात आले.तिने धुळे येथे आयोजित राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत (१७ वर्षांखालील मुलींच्या गटात,वजन गट ६८- ७२ किलोग्रॅम)विजेतेपद मिळवले. त्यानंतर तिची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली होती.

नवी दिल्ली येथे झालेल्या स्पर्धेत श्रावणी हिने शाळेच्या वतीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत कांस्य पदक पटकावले. निरंकारी एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नरेंद्र सिंह, प्राचार्या आशा रेड्डी, रझिया लखानी,पालक, शिक्षक आणि शाळेचे कर्मचारी यांनी श्रावणी सस्ते हिच्या यशाबद्दल तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तसेच प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या सर्व विश्वस्त व संचालकांनी श्रावणी सस्ते हिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
