


श्रीदत्त जयंती निमित्त पीएमपीएमएल कडून दि. १२ ते १५ डिसेंबर सेवा

पुणे, ता. १० : पीएमपीएमएल च्या स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून सुटणार यात्रा स्पेशल बसेसपीएमपीएमएल कडून श्रीदत्त जयंती निमित्ताने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पीएमपीएमएल च्या स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून दिनांक १२/१२/२०२४ ते १५/१२/२०२४ असे चार दिवसांकरिता यात्रा स्पेशल बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.
श्रीदत्त जयंती निमित्त श्री क्षेत्र नारायणपूर यात्रेसाठी एकूण ४ बसेसचे नियोजन करण्यात आले असून पीएमपीएमएल च्या स्वारगेट मुख्य बस स्थानकावरून श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणेकरिता प्रत्येकी एक तास वारंवारितेने बसेस उपलब्ध असणार आहेत.
सदरच्या यात्रा स्पेशल बससेवेचा मार्ग स्वारगेट, मार्केटयार्ड, कोंढवा बु.।।, खडीमशीन चौक, बोपदेव घाट, चांबळी, सासवड मार्गे नारायणपूर असा संचलनात राहील.
स्वारगेट ते नारायणपूर पहिली बस सकाळी ०६.०० वा. तर शेवटची बस सायंकाळी ०६.०० वा. मार्गस्थ होईल. तर नारायणपूर ते स्वारगेट पहिली बस सकाळी ०८.०० वा. तर शेवटची बस रात्रौ ०८.०० वा. मार्गस्थ होईल. तरी सर्व भाविक-भक्तांनी सदर बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपीएमएल कडून करण्यात येत आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
