


भारतीय गिग कामगार मंच तर्फे कष्टकरी महासभा

पुणे, ता. ९ : ज्ञान ज्योती सावित्री बाई फुले सभागृहात टिंबर मार्केट येथे डॉ. केशव नाना क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक ९ डिसेंबर २४ रोजी पार पडली. या वेळी दिनांक ११ डिसेंबर २४ रोजी पुणे विमानतळ येथील एरोमॉल येथे निदर्शने करण्याचे ठरले. एक एक करून ऑनलाईन कॅब कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे ठरले.

पहिला बहिष्कार दिनांक ११ डिसेंबर २४ ते १५ डिसेंबर २४ रोजी उबर वर असेल. त्या नंतर आळीपाळीने इतर कंपन्यांवर होईल. तसेच ११ डिसेंबर २४ रोजी रिक्षाचालक अधिकाऱ्यांची प्रामाणिक पणाची चाचणी परीक्षा घेतील. यावेळी मोठ्या प्रमाणात कॅब व रिक्षाचालक उपस्थित होते.

भारतीय मजदुर संघा तर्फे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री बाळासाहेब भुजबळ व पुणे जिल्हा अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी यावेळी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. कार्यक्रमाचे नियोजन संतोष उबाळे,मनोज वेताळ, आप्पा पवार, गोपाळ बांदल, संतोष भोसले, सोनी शेंडगे, जयश्री अब्राहम आदी लोकांनी केले होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️