


पुणे, ता. ६ प्रतिनिधी, : शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा संचिताताई गोसावी व कार्यालयन मुख्य सचिव कल्पनाताई मोरे (दाखले )यांच्या नेतृत्वाखाली शिवशाही व्यापारी संघ महिला आघाडी मावळ लोकसभा अध्यक्षपदी भारती चांदणे यांची नियुक्ती संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून जाहीर केले.

नवनियुक्त मावळ लोकसभा अध्यक्ष भारतीताई चांदणे यांनी व्यापारी वर्ग सर्वसामान्य नागरिक माता भगिनी यांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहण्याच्या सूचना व विनंती दाखले यांनी करून पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे ,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️