


वाहतुकीत बदल

चिंचवड, ता. 22- विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवनासमोरील मुख्य रस्ता बंद राहणार आहे, याची नोंद नागरिकांनी घ्यावी.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी
कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवार, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी तसेच अधिकृत माध्यम प्रतिनिधींना थेरगाव येथील स्व. शंकर (अण्णा) गावडे स्मृती कामगार भवन येथे प्रवेश दिला जाईल. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
१५० मीटर परिसरात इतरांना प्रवेश प्रतिबंधीत करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून संपुर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी.
मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांनी देखील निवडणूक प्रशासनास सहकार्य करून दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️
