Skip to content
02/03/2026
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
टाइम्स ऑफ पिंपरी चिंचवड वर्धापन दिन विशेष अंक 02.10.2025_page-0001

TOP&C.com

cropped-ChatGPT-Image-Oct-8-2025-09_48_18-AM.png

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Primary Menu
  • Home
  • Politics
  • National
  • Maharashtra
    • Mumbai
    • Pune
    • Pimpri/Chinchwad
    • Western Maharashtra
    • Marathwada
    • Vidarbha
  • Sport
  • Global
    • Business
    • Party Book
    • Tech News
  • DIWALI-2025
    • Article
      • Local Business
  • Entertainment
  • Health
  • Automobile
Viral Video
  • Home
  • शंकर जगतापांच्या ‘लीड’साठी अश्विनी जगताप आणि महिलांचा चिंचवडमध्ये झंझावात…
  • Daily Breaking News

शंकर जगतापांच्या ‘लीड’साठी अश्विनी जगताप आणि महिलांचा चिंचवडमध्ये झंझावात…

suwarna gaware 09/11/2024
IMG-20241109-WA0004
Spread the love

आमदार अश्विनी जगताप यांच्या उपस्थितीत काळेवाडी परिसरात कोपरा सभा, महिला बचतगटांच्या भेटी

स्थानिक महायुतीच्या माजी नगरसेवकांसह विविध नागरिकांच्या गाठीभेटींवर भर

चिंचवड : प्रतिनिधी, ९ नोव्हेंबर २०२४ – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस – आरपीआय (आठवले) मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी आमदार अश्विनी जगताप यांनी काळेवाडी परिसरात गाठीभेटी दौरा केला.

या दौऱ्यात त्यांनी कोपरा सभा, महिला बचत गटांच्या भेटीगाठी, स्थानिकांसह ‘डोअर टू डोअर’ मतदारांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि मतदारसंघातील विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली. नागरिकांनीही मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभाग घेत, मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले.

यावेळी काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी शंकर जगताप यांना विजयी करण्याचा निर्धार काळेवाडी ग्रामस्थांनी केला.आमदार अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यात विजयनगर मेनरोड, अजिंक्य कॉलनी, सहकार कॉलनी १-२-३, साईनाथ कॉलनी, नढेनगर, प्रेम लोक कॉलनी, शांती कॉलनी, सहारा कॉलनी आधी परिसरात मतदारांची संवाद साधला.

यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राजेश पिल्ले, माजी नगरसेविका नीता पाडाळे, ज्योती भारती, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, विलास पाडाळे, प्रवीण केमसे, कैलास सानप, प्रवीण आहेर, प्रकाश लोहार, रमेश काळे, शिवसेनेचे सुनील पालकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता कोकणे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार अश्विनी जगताप यांनी या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, लक्ष्मणभाऊंच्या कारकिर्दीत काळेवाडीत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.

त्यात सुसज्ज रस्ते, अंतर्गत विकासात्मक कामे, पाणीपुरवठा सुधारणा झाली आहे. यापुढेही या काळेवाडी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता महायुतीचे उमेदवार शंकर जगताप हे कटिबद्ध आहेत. आमदार जगताप यांनी या दौऱ्यात महायुती सरकारच्या योजना आणि शंकर जगताप यांच्या विकास कामांची माहिती मतदारांना दिली.

शंकर जगताप यांच्या विकासात्मक दृष्टिकोनामुळे चिंचवड मतदारसंघाच्या जनतेचा विश्वास मिळवण्यासाठी ते कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शंकर जगताप यांना मोठे मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.

———————————

(चौकट)

स्व. आमदार लक्ष्मणभाऊ आणि माझ्यावर काळेवाडीतील जनतेने भरभरून प्रेम केले. तसेच प्रत्येक निवडणुकीत आमच्यावर विश्वास व्यक्त करून आम्हाला काळेवाडीतून मताधिक्य मिळवून देत चिंचवडचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आता यावेळी हे प्रेम आणि विश्वास शंकर जगताप यांच्यावर दाखवावे. काळेवाडी गावचा आणि त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ते सक्षमपणे पार पाडतील.

– अश्विनी जगताप, (आमदार)

suwarna gaware

🖋️संपादक – सुवर्णा गवारे🖋️

Post Views: 46

Continue Reading

Previous: रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये भरला जोश; परिवर्तनाचा दिला कानमंत्र
Next: सार्वजनिक कामांबरोबरच महेशदादाची वैयक्तिक अडचणीतही साथ!

Related Stories

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram

Trending News

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते. 271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3 1

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

01/03/2026
समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे 570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b 2

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

27/02/2026
पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप 9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720 3

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

27/02/2026
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी 5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794 4

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

27/02/2026
अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’! 8aaeaba2-d64b-484f-ad1c-e9fb1d4444ce 5

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

24/02/2026

Editor

Editor

Suwarna Gaware

I am passionate about storytelling and the power of the written word. My approach to editing goes beyond grammar and structure—I focus on refining ideas, enhancing clarity, and ensuring that the author’s voice shines through. Collaboration with writers, designers, and other stakeholders is key, and I’m always excited to bring fresh perspectives to the table.

You may have missed

271e8f1c-7c41-4b6b-b19d-af18957d12c3
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.

suwarna gaware 01/03/2026
570a8e99-9470-4e4e-941c-83a470afda3b
  • Daily Breaking News
  • PCMC - Pimpri & Chinchawad Updates

समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे

suwarna gaware 27/02/2026
9fee2cda-2e2c-4302-aeec-002e33e81720
  • Daily Breaking News
  • Poilitical

पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप

suwarna gaware 27/02/2026
5cc080f0-551f-4ecd-931c-e6e1199d9794
  • Daily Breaking News
  • Education

डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

suwarna gaware 27/02/2026

Abouts

Top & C is one of India's leading news networks.Top & C is well known for its comprehensive coverage of news across various sectors, including politics, business, entertainment, sports, and global affairs. Over the years, it has built a reputation for high-quality journalism, in-depth analysis, and credible reporting news. Its digital platforms, such as the website and mobile app, offer news updates, live streaming, and multimedia content to a global audience.

Recent Posts

  • नागपूर दुर्घटनेतील कामगारांच्या वारसांना २० लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते.
  • समाविष्ट भागाला लवकरच स्वच्छ पाणीपुरवठा : आमदार महेश लांडगे
  • पवित्र पोर्टलच्या धर्तीवर प्राध्यापक आणि प्राचार्य भरती प्रक्रिया राबवा – आमदार शंकर जगताप
  • डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अँड ग्रीन ग्रोथ’ विषयावर पाचवी आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
  • अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली विधानसभेत ‘पोलखोल’!

CONTACT US

SUWARNA :- 8806400444

  • EMAIL :-
  • topandc.connect@gmail.com
  • 402, gangotri park, dighi road, bhosri 411039
  • Blog
  • Privacy Policy
  • Contact Us
  • About Us
  • About Us
  • Term of Service
  • Disclaimer
  • Facebook
  • Twitter
  • Linkedin
  • Youtube
  • Instagram
Copyright © All rights reserved. | MoreNews by AF themes.